हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Nokia G60 Vs OnePlus Nord 2T 5G : नोकियाकडून भारतात नुकतेच नवीन G-सीरीज 5G स्मार्टफोन Nokia G60 5G लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन सिंगल स्टोरेज वेरिएंट 6 GB, 128 GB सहीत येतो, ज्याची किंमत 29,999 रुपये आहे. तसेच या फोनसाठी ब्लेअर आणि आइस असे दोन कलर वेरिएंट मिळतील. या नवीन Nokia G60 5G मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले असेल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz, फुल-एचडी + रिझोल्यूशन (1080×2400 पिक्सेल) आहे.
हे लक्षात घ्या कि, या नवीन Nokia G60 5G च्या फीचर्सची थेट स्पर्धा OnePlus च्या OnePlus Nord 2T शी होते आहे. 5G कनेक्टिव्हिटी असलेला हा फोन भारतात 30,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये उपलब्ध आहे. तसेच यामध्ये 50 मेगापिक्सल कॅमेरा देखील देण्यात आलेला आहे. या दोन्ही फोनमध्ये 4500mAH ची बॅटरी देखील उपलब्ध आहे. याबरोबरच या दोन्ही फोनचे इंटरनल स्टोरेज देखील एकसारखेच आहे. अशा परिस्थितीत, समान फीचर्स असलेल्या या फोन पैकी कुठला फोन जास्त चांगला आहे हे जाणून घेऊयात…
कॅमेरा :
या नवीन Nokia G60 5G मध्ये 50-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप तर फ्रंटला 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. दुसरीकडे, OnePlus Nord 2T 5G मध्ये 50-मेगापिक्सेलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप तर सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. Nokia G60 Vs OnePlus Nord 2T 5G
डिस्प्ले :
या Nokia G60 5G मध्ये 6.58-इंचाचा FHD+ डिस्प्ले तर OnePlus Nord 2T 5G मध्ये 6.43-इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे.
चिपसेट :
या नवीन Nokia G60 5G मध्ये Snapdragon 695 5G MediaTek Dimensity 1300 ऑपरेटिंग सिस्टम Android 12 मिळतो तर दुसरीकडे OnePlus Nord 2T 5G मध्ये ऑक्सिजन OS बेस्ड Android 12 देण्यात आला आहे. Nokia G60 Vs OnePlus Nord 2T 5G
रॅम :
Nokia G60 5G मध्ये ग्राहकांना 6GB RAM मिळते. दुसरीकडे, OnePlus Nord 2T 5G मध्ये 8GB/12GB RAM दिली गेली आहे.
स्टोरेज :
Nokia G60 5G मध्ये 128GB इंटर्नल स्टोरेज आहे, तर OnePlus Nord 2T 5G मध्ये 128GB/256GB इंटर्नल स्टोरेज आहे. Nokia G60 Vs OnePlus Nord 2T 5G
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nokia.com/phones/en_in/nokia-g-60
हे पण वाचा :
आपल्या Aadhar Card मधील माहितीचा गैरवापर टाळण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या
Multibagger Stock : सोलर सर्व्हिस पुरवणाऱ्या ‘या’ कंपनीने एका वर्षात दिला 1500% नफा !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण, आजचा भाव पहा
सर्वात स्वस्त iPhone 13 कुठे मिळत आहे ते जाणून घ्या
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् 25GB डेटा