सुशांत सिंग प्रकरणात नामांकित, राज कुंद्राशी लिंक आणि आता आर्यन खान प्रकरणात NCB कार्यालयात दिसलेला कुणाल जानी कोण आहे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । क्रूझवरील ड्रग्‍स प्रकरणात रविवारी आणखी एक ट्विस्ट समोर आला आहे. यापूर्वी, बेपत्ता असलेल्या केपी गोसावीचा कथित बॉडीगार्ड प्रभाकर सेलने NCB वर डील केल्याचा आरोप केला होता, आता त्याचा एक व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये, कथित फरार साक्षीदार केपी गोसावी NCB कार्यालयात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा ऑडिओ रेकॉर्ड करताना दिसत आहे.

हॉटेलियर कुणाल जानी देखील थोडा वेळ त्याच व्हिडीओमध्ये दिसत आहे, ज्याला यापूर्वीच आणखी एका ड्रग्‍स प्रकरणात अटक करण्यात आली होती. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूशी संबंधित तपासात कुणाल जानीचं नाव पहिल्यांदा समोर आलं होतं.

प्रभाकर सेल हा आर्यन खानशी संबंधित क्रूज ड्रग्स प्रकरणातील एक स्वतंत्र साक्षीदार आहे. या जारी केलेल्या व्हिडिओमध्ये आता, कुणाल जानीने NCB कार्यालयात हजेरी लावल्याने या महिन्याच्या सुरुवातीला टाकलेल्या क्रूझ जहाजावरील NCB च्या छाप्याशी त्याचा काही संबंध असल्याचा अंदाज बांधला जात आहे, ज्यामध्ये आर्यन खान आणि इतरांना अटक करण्यात आली होती. जानी हा वांद्रे येथील एका आघाडीच्या रेस्टॉरंटचे संचालक आहे.

मात्र, NCB च्या सूत्रांनी सांगितले की,”जानीला एजन्सीने एका वेगळ्या ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. ज्यावेळी आर्यन खान देखील तिथे हजर होता तेव्हा जानीचे स्टेटमेंट देखील नोंदवले जात होते.”

जानीला NCB ने 30 सप्टेंबर रोजी एका ड्रग्स प्रकरणात अटक केली होती ज्यात अभिनेता अर्जुन रामपालचा साथीदार अगिसिलास डेमेट्रिअडेस हा देखील एक आरोपी आहे. डिमेट्रिएड्सवर ड्रग्ज सिंडिकेट चालवल्याचा आरोप आहे. जानीला 10 ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर झाला.

NCB च्या सूत्रांनी सांगितले की,”अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणात जानीचे नाव पहिल्यांदा समोर आले. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) अधिकाऱ्यांना जानी आणि रिया चक्रवर्तीचा चॅट ग्रुप सापडला जिथे ड्रग्जबाबत चर्चा होत होती.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा जानीच्या हॉटेलएक्समध्ये पार्टनर आहे. पॉर्न फिल्म प्रकरणातील आरोपी कुंद्रा गेल्या महिन्यात जामिनावर तुरुंगातून बाहेर आला. प्रभाकर सेलने रविवारी दावा केला होता की,”NCB च्या एका अधिकाऱ्याने आणि इतरांनी आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटी रुपयांची मागणी केली होती. गोसावी यांचा समावेश आहे.”

Leave a Comment