आघाडीतील नेते बायकोने मारले तर सांगतील केंद्र सरकारचा हात आहे; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकार व भाजपमध्ये सध्या अतिवृष्टी, नुकसान भरपाई यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केला जात आहे. दरम्यान भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. या महाविकास आघाडी सरकारने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. प्रत्येकवेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवायचे. या आघाडीतील नेते बायकोने मारले तरी सांगतील कि या मागे केंद्र सरकारचा हात आहे, अशी घणाघाती टीका फडणवीसांनी केली.

माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी येथे देगलूर पोट-निवडणुकीसाठी उपस्थिती लावली. यावेळी आयोजित प्रचारसभेट ते म्हणाले की, या सरकारची प्रवृत्ती मिळेल त्यामध्ये खाऊ लागले आहेत. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे.

फडणवीस पुढे म्हणाले की, या सरकारने 2 वर्षात राज्यात केवळ भ्रष्टाचार केला. आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेतून दहा लाख लोकांना घरे दिली. मात्र, या सरकारने गरिबाला एकही घर दिलं नाही. फक्त छपाई आणि पैसे कमावण्याचा उद्योग सुरू आहे. पाच वर्षात एकाही शेतकऱ्यांचे विजेचे बिल आम्ही सत्तेत होतो तेव्हा कापले नाही. मात्र, या आघाडी सरकारने शेतकर्याना अंधारात ठेवले. महाराष्ट्र सरकारने दोन वर्षात शेतकर्याना एक फुटकी दमडीही दिली नाही, असा आरोप फडणवीस यांनी केली आहे.

आघाडीचे सरकार पैसा फेक तमाशा देखवालयांचे – फडणवीस

मूठभर धन दांडग्या लोकांचं सरकार आहे, मालदार सेठ सावकार लोकांचे हे सरकार आहे. लोकशाहीत मतदानाच्या माध्यमातून आपला राग व्यक्त करता येतो. या सरकारने एकेका समाजाची अवस्था काय केली, ओबीसीचे आरक्षण काढले. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचे आरक्षण गेले. हे सरकार केवळ पैसा फेक तमाशा देख वाल्या लोकांचे सरकार असल्याची टीकाही यावेळी फडणवीस यांनी केली आहे.

You might also like