Nora Fatehi ने सुकेश चंद्रशेखरशी संपर्क तोडला होता, मात्र जॅकलीन गिफ्ट्स घेत राहिली

Nora Fatehi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री Nora Fatehi ही आणि जॅकलिन फर्नांडिस या सुकेश चंद्रशेखरच्या संपर्कात आल्यापासूनचांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. गुरुवारी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 200 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी नोराची चौकशी केली. नोराकडून गुन्हे शाखेसमोर आपला जबाब नोंदवण्यात आला. एका महिन्यात चौकशीला सामोरे जाण्याची नोराची ही दुसरी वेळ आहे. दिल्ली पोलिसांचे स्पेशल सीपी (गुन्हे) रवींद्र सिंह यादव यांनी याबाबत सांगितले की,” यावेळी नोरा फतेही, मेहबूब आणि पिंका इराणी यांना एकत्र बसवून चौकशी करण्यात आली.”

रवींद्र सिंह यादव पुढे म्हणाले कि, “या तिघांकडून जबाब नोंदवून घेण्यात आल्यानंतर आम्हाला समाधान झाले आहे की, मेहबूबला जी 65 लाखांची कार भेट म्हणून देण्यात आली होती… मेहबूबने ती पुढे विकली होती, ही ईडीच्य नोटीसमध्येही आहे.” Nora Fatehi ने आपल्या जबाबात सांगितले की, तिने एकदा सुकेशकडून गिफ्ट्स घेतले होते आणि जेव्हा तिला वाटले की, हे जरा जास्तच होत आहे तेव्हा तिने त्याच्याशी असलेला संपर्क तोडला.

Conman Sukesh Chandrashekhar On Gifting Nora Fatehi A Car

Nora Fatehi ने आपल्या जबाबात असेही म्हटले की, “तो जबरदस्तीने नाते जोडण्याचा प्रयत्न करत होता त्यामुळे मी त्याच्याशी असलेला संपर्क तोडला.” पोलिसांनी याबाबत सांगितले की,” नोरा असे म्हणत नव्हती की काहीतरी गडबड असल्याचे तिला कळले आहे. बाकीच्या गोष्टी पुढील तपासात बाहेर येईलच. आम्ही तिला विचारले कि, गाडी का परत केली नाही??? यावर नोराने सांगितले की,” त्याने मागितली नाही आणि आम्ही दिली नाही. नातेवाईक वापरत होते. ”

रवींद्र सिंह यादव पुढे म्हणाले कि, “Nora Fatehi आणि जॅकलीन या दोघींची प्रकरणे वेगवेगळी आहेत. कारण नोराला काहीतरी गडबड असल्याचे कळले तेव्हा तिने सुकेशशी संपर्क तोडला मात्र जॅकलीन गिफ्ट्स घेत राहिली.”

Rs 200 core extortion case involving conman Sukesh Chandrashekhar: After Jacqueline Fernandez, Nora Fatehi summoned by Delhi Police | Hindi Movie News - Bollywood - Times of India

जॅकलीनच्या मॅनेजरकडून बाईक परत मिळवली

यावेळी केलेल्या तपासात जॅकलिन फर्नांडिसचे असलेले मॅनेजर प्रशांत यांनी सांगितले की,” त्याला न विचारता ही बाईक देण्यात आली होती. जॅकलीनशी मैत्री करवून देणे हा सुकेशचा उद्देश होता.” प्रशांतने पुढे सांगितले की,” मी पुढे पाऊल टाकले नाही आणि मी ही बाईक कधी वापरलीच नाही. त्याला माझ्याद्वारे जॅकलीनपर्यंत पोहोचायचे होते.” तसेच ही बाईक आम्ही मागितली होती आणि आम्ही ती जप्त केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. Nora Fatehi

Amit Shah's Office No. Spoofed to Befriend Jacqueline Fernandez: What ED Said About 'Conman' Sukesh

सत्य उघड होईल

रवींद्र सिंह यादव पुढे म्हणाले कि, “ सत्य लवकरच बाहेर यावे अशी कोणत्याही अधिकाऱ्याची ईच्छा असते. तसेच आतापर्यंतचा तपास हा योग्य दिशेने चालला आहे. आमच्या या तपासाच्या आधारे न्यायालयाकडूनही या मोठ्या गुन्ह्यांना शिक्षा व्हायला हवी.” Nora Fatehi

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या :  https://www.instagram.com/norafatehi/?hl=en

हे पण वाचा :

IPL 2023 साठी मुंबई इंडियन्सकडून Mark Boucher ची मुख्य प्रशिक्षकपदी निवड

LPG : आता मिस्ड कॉल देऊन अशा प्रकारे घरपोच मिळवा सिलेंडर

Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन दर तपासा

Post Office च्या ‘या’ योजनेत 100 रुपयांपासून गुंतवणूक करून मिळवा भरपूर रिटर्न

‘या’ Multibagger Stock ने फक्त 5 आठवड्यात गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट