उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनची प्रकृती चिंताजनक!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर कोरिया, जगातील एक सर्वात महत्वाचा देश आहे, ज्यांचा सर्वोच्च नेता किम जोंग यांच्याविषयी बोलले जाते कि त्याची मनःस्थिती समजण्यासारखी नाही, कारण त्याला असा हुकूमशहा मानले जाते जो त्याच्या मनात आले तर काहीही करु शकतो,आता हाच किम जोंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, यावेळी त्याच्या हट्टामुळे नव्हे तर तब्येतीमुळे.

किम जोंग प्रकृती अस्वस्थतेने ग्रस्त आहेत या चर्चेने आता जोर धरलाय,ह्रदयाच्या शस्त्रक्रियेनंतर तो गंभीर आजारी असल्याचे मीडियाच्या वृत्तानुसार, सांगण्यात आले.कार्डियोवॅस्कुलर ऑपरेशननंतर किम गंभीररित्या आजारी आहे.

North Korea's Kim Jong Un in grave danger after surgery: report

किम आजारी असल्याच्या वृत्ताला दुजोरा तेव्हा मिळाला जेव्हा उत्तर कोरियाच्या सर्वात महत्वाच्या कार्यक्रमात १५ एप्रिल रोजी तो सहभागी झालेला नव्हता खरं तर किम जोंगचे बाबा आणि उत्तर कोरियाचे संस्थापक किम इल सुंग यांची जयंती १५ एप्रिल रोजी साजरी केली गेली होती आणि प्रत्येक वर्षी किम येत होता. परंतु यावेळी मात्र तो हजर नव्हता, तेव्हापासून त्याच्या तब्येतीविषयी अटकळ सुरू होती.तथापि, त्यापूर्वी किम जोंग-उनच्या आरोग्याबद्दल अनेक चुकीच्या अफवा पसरल्या आहेत. किम सध्या ३६ वर्षांचा आहे, परंतु तो आजारी असल्याचे सांगितले जाते.११ एप्रिल रोजी ती अखेरचा सार्वजनिक ठिकाणी दिसला होता.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.