उत्तर नागपूरच्या आ. मिलिंद मानेंना नागरिकांनी घेतले फैलावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर प्रतिनिधी। सध्या महाराष्ट्रामध्ये आगामी विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकांविरुद्ध ताकदीने दंड थोपटले आहेत. आपला उमेदवार जिंकावा यासाठी कार्यकर्त्यांसह पदाधिकारी जोरात तयारी करत आहेत. मात्र काही ठिकाणी आपल्याच मतदार संघातील उमेदवारांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशीच काहीशी परिस्थिती ओढवली आहे ‘उत्तर नागपूर’चे विद्यमान आमदार व भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ मिलिंद माने यांच्यावर.

आज प्रचारादरम्यान मानेंना जनतेच्या विरोधाचा चांगलाच सामना करावा लागला. उत्तर नागपूर परिसरात भाजपाचे उमेदवार असलेले माने प्रचारासाठी गेले असता लोक त्यांच्यावर चांगलेच भडकले. यावेळी परिसरातील महिलांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. त्यांच्यावर पाण्याच्या प्रश्नाबाबत जाब विचारत प्रश्नांचा मारा करत ”मागील पाच वर्षे कोठे होता?” असा सवाल करण्यात आला. यामुळे माने चांगलेच भांबावल्याचे पहायला मिळाले. यावेळी परिसरातील नागरिकांना कार्यकर्त्यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याचे दिसून आले.

दरम्यान या सर्व प्रकरणावर आता उत्तर नागपूरच्या राजकारणाचा पारा चांगलाच तापल्याचे दिसून आले. यावेळी परिसरातील डॉ.नितीन राऊत यांनी सुद्धा डॉ.मिलिंद माने यांच्या कार्यशैली वर प्रश्न निर्माण केला. मात्र या सर्व प्रकरणावर डॉ.मिलिंद माने यांनी नागरिकांना सध्यातरी आश्वासन देत शांत केल्याची माहिती देण्यात आली.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment