हार्दिक पंड्या नव्हे तर ‘हा’ खेळाडू भारताचा नवा T20 कर्णधार? BCCI कडून नाव निश्चित?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय T20 मधून निवृत्ती जाहीर केली. रोहितच्या या निर्णयानंतर टीम इंडियाचा नवा कर्णधार कोण असेल याबाबत चर्चा रंगली आहे. सध्याचा भारताचा उपकर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांच्याकडेच आपोआप भारतीय संघाची धुरा दिली जाईल असं बोललं जात होते. मात्र यात आता नवा ट्विस्ट आला आहे. टीम इंडियाचा तडाखेबंद फलंदाज सूर्यकुमार यादवचे (Suryakumar Yadav) नाव आता कर्णधार पदाच्या शर्यतीत पुढे येत आहे. नवनिवार्चित प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर हे दोघेही सूर्यकुमार बाबत सकारात्मक असून यामुळे हार्दिक पंड्याचा गेम होण्याची शक्यता आहे.

2026 साली पुढचा T20 विश्वचषक आहे. त्यामुळे भारतीय संघाला आत्तापासूनच संपूर्ण संघबांधणी करावी लागणार आहे. यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे तो म्हणजे कर्णधार.. जो कोणी आत्ता कर्णधार जाईल त्याला 2026 च्या T20 वर्ल्डकप पर्यंत योग्य रीतीने संघ तयार करावा लागणार आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. याआधीही त्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सने विजेतेपद पटकावले आहे. त्यानंतर मुंबई इंडियन्सने सुद्धा रोहित ज्या जागी हार्दिकची कर्णधार म्हणून निवड केली होती. या एकूण सर्व अनुभवांमुळे हार्दिक पांड्याला टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा मजबूत दावेदार मानलं जात होते. मात्र यामध्ये आता सूर्यकुमार यादवचे नाव समोर आल्याने आणखी ट्विस्ट आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम गंभीर आणि अजित आगरकर हे दोघेही कर्णधार पदासाठी सूर्यकुमार यादवबाबत सकारात्मक आहेत. कारण मागील काही वर्षापासून अनेकदा दुखापतींनी त्रस्त असलेला दोन वर्षांनंतर भारतात होणाऱ्या टी-20 विश्वचषकापर्यंत किती सामने खेळेल हे कोणीच सांगू शकत नाही असं या दोन्ही खेळाडूंना वाटतं. याबाबत हार्दिकशी चर्चाही झाली असल्याचे एका रिपोर्टमधून सांगण्यात आला आहे. संघात स्थिरता निर्माण करण्यासाठी दीर्घकाळ पर्याय निश्चित करणं गरजेचं असल्याचे गंभीर आणि आगरकर याना वाटत. त्यामुळे ऐनवेळी हार्दिक ऐवजी सूर्याच्या गळ्यात सुद्धा कर्णधारपदाची माळ पडू शकते.