नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेट (cricket) हा जागतिक स्तरावर सर्वाधिक खेळला जाणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळ आहे. भारतामध्ये तर क्रिकेट (cricket) प्रचंड लोकप्रिय आहे. गेल्या काही वर्षांपासून हा खेळ मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला आहे. या खेळामुळे खेळाडूंना प्रसिद्धी आणि पैसे दोन्ही मिळाले. भारतामध्ये आपल्या क्रिकेटर्सप्रमाणे परदेशी खेळाडूंना मानणारा एक मोठा वर्ग आहे. आयपीएलमुळे या परदेशी खेळाडूंना भारतात पूर्वीपेक्षा अधिक प्रसिद्धी मिळत आहे. यामधील काही परदेशी खेळाडूंनी तर आणखी पुढे जात भारताशी नातेसंबंध जोडले आहेत. विविध देशांतील क्रिकेटर्स भारतीय मुलींशी लग्न करून भारताचे जावई बनले आहेत.
भारतीय मुलींशी लग्न करणाऱ्या परदेशी क्रिकेटर्समध्ये (cricket) श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तान या देशांच्या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंमध्ये माईक ब्रेअरली, मुथय्या मुरलीधरन, शॉन टेट, शोएब मलिक, हसन अली, ग्लेन मॅक्सवेल या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंची सविस्तर माहिती चला पाहूया……
1) माईक ब्रेअरली – इंग्लंडचे माजी कर्णधार माईक ब्रेअरली यांनी भारतीय मुलीशी लग्न केलं आहे. 1976-77 च्या दरम्यान भारत दौऱ्यावर आलेले माईक तेव्हा माना साराभाई यांना भेटले होते. यानंतर दोघांनी लग्न केलं आणि सध्या ते इंग्लंडमध्ये राहतात. माईक आणि माना यांना दोन मुलं आहेत.
2) मुथय्या मुरलीधरन – आपल्या ऑफ स्पिन बॉलिंगनं भारतीय प्लेयर्सची विकेट घेणाऱ्या मुथय्या मुरलीधरनला प्रेमाच्या मैदानात मात्र एका भारतीय मुलीने क्लिन बोल्ड केलं आहे. मुथय्या मुरलीधरननं चेन्नईतील मधिमलर रामामूर्ती हिच्याशी लग्न केलं आहे. मधिमलर ही बिझनेसमन नित्या आणि एस. रामामूर्ती यांची मुलगी आहे.
3) शॉन टेट – ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर असलेल्या शॉन टेटनं माशूम सिंघा या भारतीय मुलीशी लग्न केलं आहे. हे दोन्ही लव्ह बर्ड 2010 मध्ये एका आयपीएल पार्टीत एकमेकांना पहिल्यांदा भेटले होते. सिंघा एक अँकर आणि मॉडेल आहे.
4) शोएब मलिक – पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक आणि भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा ही जोडी लोकप्रिय स्पोर्ट्स कपलपैकी एक आहे. पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या शोएबनं भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाशी लग्न केलं आहे. दोघांना एक मुलगा आहे.
5) हसन अली – पाकिस्तानी क्रिकेटर हसन अलीनं आपल्या सहकाऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवत भारतीय मुलीशी लग्न केलं. हरियाणातील सामिया आरजूसोबत हसन अलीनं लग्न केलं आहे. सामिया आणि हसनची पहिली भेट दुबईमध्ये झाली होती. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि 2019 मध्ये त्यांनी लग्न केलं. सामिया इंजिनीअर आहे.
6) ग्लेन मॅक्सवेल – भारतीय मुलींशी लग्न करणाऱ्या परदेशी खेळाडूंच्या यादीमध्ये ग्लेन मॅक्सवेल हे आणखी एक नाव सामील झालं आहे. ऑस्ट्रेलियाच्या या स्टार खेळाडूनं 18 मार्च 2022 रोजी विनी रमण या भारतीय मुलीशी लग्न केलं. फार्मासिस्ट असलेल्या विनीचा जन्म मेलबर्नमध्ये झालेला असून ती मूळची भारतीय आहे. या जोडप्यानं ख्रिश्चन आणि भारतीय अशा दोन्ही पद्धतीनं लग्न केलं आहे.
हे पण वाचा :
वर्षातील पहिले चंद्रग्रहण लवकरच; तारीख, वेळ आणि सुतक कालावधी जाणून घ्या
15 दिवसांत पैसे डबल…; ‘या’ कंपनीच्या शेअर्सने केली कमाल
वेडात मराठे ‘वीर दौडले सात’! शिवरायांच्या पराक्रमी वीरांचा जाज्वल्य इतिहास रुपेरी पडद्यावर झळकणार