तेरे दुकान में घुस के मारुंगा’ म्हणत हातात चाकू घेऊन गावगुंडांचा धिंगाणा!

डोंबिवली : हॅलो महाराष्ट्र – डोंबिवलीमध्ये (Dombivali) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये एका तरुणाने हातात चाकू घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. हा आरोपी तरुण हातात चाकू घेऊन दुसऱ्या तरुणाला धमकावत होता. यावेळी तरुणाचा दहशत माजवणारा व्हिडीओ एकानं मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही संपूर्ण घटना डोंबिवलीच्या (Dombivali) शेलार नाका परिसरात घडली आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये दोघा तरुणांमध्ये वाद झाल्याचं दिसून येत आहे. यामध्ये एक तरुण टॉवेलवर आहे. तशाच अवस्थेत तो हातात चाकू घेऊन दुसऱ्या तरुणाला धमकाव होता. या तरुणाला एक जण रोखण्यासाठी मध्येही पडला होता. त्या तरुणाला उद्देशून ‘सरस सरक.. तेरे दुकान में घुस के मारुंगा’ अशा शब्दांत चाकू हातात घेतलेला तरुण सांगत होता. यावेळी आजूबाजूला मोठ्या प्रमाणात लोक जमले होते. गावगुंडांचा धिंगाणा पाहून आजूबाजूच्या लोकांची चांगलीच घाबरगु्ंडी उडाली.

नेमका कशामुळे झाला राडा ?
डोंबिवली (Dombivali) पूर्वेच्या शेलार नाका परिसरात चंद्या गुलकंद नावाचा 20 वर्षांचा तरुण राहतो. चंद्रकांत गुलालकर असं त्याचं खरं नाव आहे. चंद्रकांत याने परिसरातल्या लोकांशी वाद घालत चाकू घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचताच त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या आरोपी तरुणावर यापूर्वीही 2 गुन्हे दाखल असल्याची माहिती डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांनी दिली आहे.

हे पण वाचा :

अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

BSNL चा धमाकेदार प्लॅन : Jio अन Airtel पेक्षाही स्वस्त; 19 रुपयात महिनाभर घेता येणार अनेक फायदे

सपना चौधरीने घराच्या छतावर आपल्या पतीसोबत केला रोमान्स

एका केळाचे अनेक गुणकारी उपाय : ‘या’ वेळी खाल्यास लांब राहतील सर्व आजार

Flipkart Sale : 200 रुपयांपर्यंत मिळणार ‘या’ वस्तू; तुम्हीही करा खरेदी