शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला नसेल तर तो लैंगिक अत्याचार ठरू शकत नाही – हायकोर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर । नागपुरात २०१६ साली घडलेल्या लैगिक अत्याचाराच्या एका प्रकरणात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं महत्त्वाचे निरीक्षण नोंदवल आहे.
शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला नसेल तर तो लैंगिक अत्याचार ठरू शकत नाही, असा महत्वपूर्ण निकाल आहे. ज्यावेळी लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला तरच तो लैंगिक अत्याचार होऊ शकतो, असंही कोर्टानं नमूद केलं आहे. याशिवाय फक्त कपड्यांवरुन शरीराची चाचपणी करणं लैंगिक अत्याचार होऊ शकत नाही, असंही कोर्टानं नमूद केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये २०१६ साली घडलेल्या या प्रकरणात ३९ वर्षीय आरोपीनं एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. यावेळी पॉक्सो कायद्यांतर्गंत आरोपीला ३ वर्षांची शिक्षा करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपीनं पीडित मुलीच्या छातीला पकडून निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर लैंगिक अत्याचार प्रकरणी ३९ वर्षीय आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली होती. या आरोपीनं शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

त्यानुसार कोर्टानं एक महत्त्वाचा निकाल दिला आहे. पोक्सो या कायद्यानुसार आरोपीनं लैंगिक अत्याचाराच्या हेतूनं मुलांच्या खासगी अवयवांना थेट स्पर्श करणं आवश्यक आहे. या प्रकरणात असा कोणताही गुन्हा घडला नाहीये. फक्त कपड्यावरुन मुलांच्या शरीराची चाचपणी करणं ही कृती लैंगिक अत्याचार ठरु शकत नाही, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. या प्रकरणात महिलांच्या चारित्र्याला धक्का पोहोचवणारी असल्यानं हा गुन्हा भारतीय दंडविधानाच्या ३५४ कलमांतर्गत येतो. यानुसार आरोपीला १ वर्षांची शिक्षा सुनावली जाऊ शकते, असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’