‘मतदानातील नोटा पर्याय लोकशाहीला घातक’ – चंद्रकांत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । आज ‘विजयादशमी’चा उत्सव देशभरासह राज्यभरात देखील मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर देश आणि महाराष्ट्रातील मान्यवर जनतेला शुभेच्छा देत आहेत. ‘भाजपा’चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच यावेळी मतदारांना दिलेल्या नोटा पर्यायाबाबत त्यांनी विवादित वक्तव्य केले.

कोल्हापुरात चंद्रकांत पाटील बोलताना आपले सध्याच्या राजकारणावरील मत मांडले. यावेळी ”मतदानातील ‘नोटा’ हा पर्याय लोकशाहीला घातक असल्या”चे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. त्यामुळे लोकांनी विचारपूर्वक कोणत्याही एका बऱ्या उमेदवाराला मतदान करण्याची गरज व्यक्त केली.

तसेच विजयादशमी-दसऱ्यानिमित्त पाटील यांनी राज्यातील राजकारण शुद्ध होण्यासाठी  ‘मतदानाचा संकल्प’ करण्याचे आवाहन केले. मात्र, नोटा सारख्या संविधानिक पर्यायाला लोकशाहीला घातक म्हणत पाटील यांनी नव्या वादाला वाट करून दिली आहे.

इतर काही बातम्या-