हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |पुसेसावळीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर सध्या पोलीस आणि सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जमावबंदी लागू करून मोर्चा, आंदोलनांना मनाई करण्यात आली आहे. तसेच गणेशोत्सव तोंडावर असल्याने हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे. तसेच सोशल मीडियावर देखील लक्ष ठेऊन आहे. त्याचाच एक भाग म्हणजे कराड तालुक्यातील सोशल मीडियात आक्षपार्ह पोस्ट प्रकरणी 48 जणांवर कारवाई करत नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
काल शुक्रवारी, गणेशोत्सव आणि रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कराड ग्रामीण पोलीसांनी वाघेरी, काले , कालेटेक आणि रेठरे बुद्रुक या गावांमध्ये संचलन केले. या संचलनात सर्व विभागांचा फौजफाटा सहभागी झाला होता.
कराड तालुक्यातील 'या' गावांमध्ये पोलिसांचे संचलन; आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी 48 जणांना नोटीसा pic.twitter.com/LmZkOYVbs6
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) September 16, 2023
कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर, कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दल आणि गृह रक्षक दलाच्या एकूण 248 कर्मचाऱ्यांचा फौजफाटा संचलनात सहभागी झाला होता. वाघेरी, काले, कालेटेक आणि रेठरे बुद्रुक या ठिकाणी हे संचलन करण्यात आले.