औरंगाबाद – एसटी महामंडळाने संपकरी कर्मचार्यांच्या बडतर्फीच्या कारवाईला सुरुवात केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात बारा कर्मचाऱ्यांना बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशा नोटीस बजावण्यात आल्या असल्याची माहिती विभागीय नियंत्रक अरुण शहा यांनी दिली आहे. दुसरीकडे 15 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या शासनात विलीनीकरणासाठी संप सुरूच आहे.
या संपाच्या अनुषंगाने परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी सोमवार पर्यंत चा अल्टिमेटम दिला होता. मात्र, तरीही कर्मचारीया अल्टीमेटम मला न जुमानता आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. सोमवारी कामावर कोणीही हजर झाले नव्हते. तरीही एसटी प्रशासनाने एक दिवस वाट बघितल्यानंतर बुधवारपासून मात्र बडतर्फी च्या अनुषंगाने कारवाई सुरू केली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील बारा कर्मचाऱ्यांना ‘बडतर्फ का करण्यात येऊ नये’ अशा नोटीस बजावण्यात आले आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये काही प्रमाणात धाकधूक वाढली असून, आता आणखी किती कर्मचारी कर्तव्यावर हजर होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
काल दिवसभरात 41 लालपरींच्या 97 फेऱ्या –
औरंगाबाद विभागात एसटी महामंडळातर्फे काल दिवसभरात 41 बसच्या माध्यमातून तब्बल 97 फेऱ्या करण्यात आल्या. यामध्ये पुणे आणि नाशिक मार्गावर 21 शिवशाही बस चालवण्यात आलेल्या यामध्ये एकूण दोन हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळात कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने काही प्रमाणात एसटीची सेवा चालवण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.