आता आधार कार्डही केले जाऊ शकते लॉक, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली ।  आजच्या काळात आधार कार्ड हे एक आवश्यक डॉक्युमेंट्स बनले आहे. ऑनलाइन बँकिंगपासून ते रेशनकार्ड दुकानापर्यंत आधार कार्डचा वापर केला जातो. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे.

आधार कार्डच्या वाढत्या महत्त्वामुळे त्याचा गैरवापर होत असल्याच्या बातम्याही येत आहेत. आधार कार्डचा गैरवापर होऊ नये, यासाठी सरकार वेळोवेळी त्याच्या संरक्षणासाठी उपाययोजना करत असते. एकीकडे, जिथे तुम्हाला घरबसल्या खऱ्या आणि बनावट आधारकार्डची माहिती सहज मिळू शकते, तिथे ते लॉकही केले जाऊ शकते जेणेकरुन इतर कोणी तुमचे आधार कार्ड वापरू शकणार नाही. तुम्ही तुमच्या घरच्या आरामात तुमचे आधार कार्ड लॉक किंवा अनलॉक करू शकता.

लॉक करण्याचे फायदे

UIDAI, आधार कार्ड जारी करणारी संस्था, तुम्हाला तुमचे आधार कार्ड लॉक करण्याची सुविधा देखील देते. आधार कार्ड लॉक करण्याचा फायदा म्हणजे तुमचे आधार कार्ड कुठेतरी हरवले तर कोणीही त्याचा वापर करू शकत नाही. अशा प्रकारे आधारशी लिंक केलेला तुमचा डेटा सुरक्षित राहतो.

आधार कार्ड कसे लॉक करावे ?

आधार कार्ड लॉक करण्यासाठी, पहिले तुम्हाला तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवरून 1947 वर GETOTP मेसेज पाठवावा लागेल. मेसेज पाठवल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. तुम्हाला ‘LOCKUID आधार नंबर’ टाइप करून हा OTP पुन्हा 1947 वर पाठवावा लागेल. अशा प्रकारे तुमचे आधार कार्ड लॉक होईल.

अनलॉक कसे करावे ?

तुम्हाला तुमचे लॉक केलेले आधार कार्ड पुन्हा अनलॉक करायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाइल नंबरवरून 1947 वर GETOTP एसएमएस पाठवावा लागेल. मेसेज पाठवल्यानंतर मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तुम्हाला ‘UNLOCKUID आधार नंबर’ आणि OTP लिहून 1947 वर पाठवावा लागेल. अशा प्रकारे तुमचे आधार कार्ड अनलॉक होईल.

ऑनलाइन लॉक करा

सर्व प्रथम UIDAI वेबसाइट uidai.gov.in वर क्लिक करा. वेबपेज खाली स्क्रोल करा आणि आधार सेवा कॉलममधील आधार पेपरलेस ऑफलाइन ई-केवायसी अंतर्गत lock/unlock biometric वर क्लिक करा. तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. हे पेज खाली स्क्रोल करा आणि कन्फर्म करा वर क्लिक करा. त्या खाली, lock/unlock biometric वर क्लिक करा. आता कॅप्चा कोड असलेले पेज उघडेल. येथे तुम्हाला 12 अंकी आधार नंबर टाकावा लागेल. कॅप्चा कोड टाका आणि Send OTP वर क्लिक करा. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल. पेजमध्ये हा OTP टाका आणि सबमिट वर क्लिक करा. अशा प्रकारे तुमचे आधार कार्ड लॉक होईल.