धक्कादायक ! पोटच्या दोन मुलांसह महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरीच्या मालडोंगरी या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका महिलेने आपल्या पोटच्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. पती-पत्नी सतत होणाऱ्या वादामुळे तिने हे पाऊल उचलले असल्याचे समजत आहे. मात्र अद्याप खरे कारण समजू शकले नाही. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्ती केली जात आहे.

दीपा रवींद्र पारधी असे मृत महिलेचे नाव असून तिने आपल्या पोटच्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मालडोंगरी भागात मृत दीपा रवींद्र पारधी या आपला पती रवींद्र मुरलीधर पारधी आणि दोन मुलांसह राहत होत्या. घटनेच्या आदल्या दिवशी पती रवींद्र व पत्नी दीपा यांच्यामध्ये वाद झाल्यामुळे रागाच्या भरात पत्नी दीपा आपल्या दोन मुलांसह घरातून निघून गेल्या.

यानंतर पती राजेंद्र याने नातेवाईक- शेजार्‍यांसह शोधाशोध केली असता सकाळी मालडोंगरीकडे जाणाऱ्या मार्गालगत असलेल्या शेतातील विहिरीत गावकऱ्यांना दीपाचा मुलांसह मृतदेह आढळून आला.या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी तिन्ही मृतदेह बाहेर काढले. पती पत्नीमध्ये सतत होणाऱ्या वादामुळे त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. ब्रह्मपुरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

You might also like