आता अशाप्रकारे बदला आपल्या आधार कार्डमधील फोटो

नवी दिल्ली । भारतातील कोणत्याही नागरिकासाठी स्वत:ची ओळख पटवण्यासाठी आधार एक महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. केंद्र सरकारकडून प्रत्येक भारतीय नागरिकाला 12 अंकी युनिक आयडेंटिटी नंबर जारी केला जातो. ज्यामध्ये व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, फोटोसह त्याची बायोमेट्रिक इन्फर्मेशनही असते.

जर तुम्हाला आधार वरील फोटो आवडला नसेल तर तुम्ही तो बदलून घेऊ शकता. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) कडे आधार नंबर जारी करण्याची आणि मॅनेज करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

UIDAI फक्त नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख, ई-मेल पत्ताऍड्रेस आणि फोटो बदलण्यासाठी ऑफलाइन सुविधा पुरवते. ते ऑनलाइन आणि पोस्टाद्वारे करता येत नाही. सोप्या शब्दात समजून घ्यायचे झाले तर तुम्हांला फोटोमध्ये बदल करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या जवळच्या एनरोलमेंट सेंटरवर जावे लागेल किंवा तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन देखील हे काम करू शकता.

आधार कार्डमधील फोटो बदलण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे
1. पहिले तुम्हाला UIDAI ची वेबसाइट  http://uidai.gov.in वर लॉग इन करावे लागेल आणि आधार एनरोलमेंट फॉर्म डाउनलोड करावा लागेल.
2. हा आधार एनरोलमेंट फॉर्म भरा आणि जवळच्या आधार एनरोलमेंट सेंटरवर सबमिट करा.
3. आता कर्मचारी तुमचा बायोमेट्रिक डिटेल्स आधार एनरोलमेंट सेंटरवर घेईल.
4. आता आधार एनरोलमेंट सेंटरचा कर्मचारी तुमचा फोटो घेईल.
5. आता आधार एनरोलमेंट सेंटरचा कर्मचारी 25 रुपये + GST ​​फी म्हणून घेऊन तुमच्या आधार कार्डमधील फोटो अपडेट करेल.
6. आधार एनरोलमेंट सेंटरचा कर्मचारी तुम्हाला URN सोबत एक स्लिप देखील देईल.
7. तुमचा आधार कार्ड फोटो बदलला आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही या URN चा वापर करू शकता.
8. आधार कार्ड फोटो अपडेट केल्यानंतर, नवीन फोटोसह अपडेट केलेले आधार कार्ड UIDAI वेबसाइटवरून डाउनलोड केले जाऊ शकते.