लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंचे मोठे विधान ; म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीस राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनीही उपस्थिती लावली होती. राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत डॉ. टोपे यांनी मोठे विधान केले आहे. “आज शंभर टक्के लॉकडाऊन लावण्याची गरज नाही. पण नॉन इसेन्शियल अॅक्टिव्हिटी तपासण्यात येणारे आहे. कोरोनाचा व्हायरस रोखण्यासाठी गर्दी थांबवणे गरजेचे आहे. निर्बंधांच्या बाबतीत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील,” असे डॉ. टोपे यांनी म्हंटले आहे.

आरोग्यमंत्री डॉ. टोपे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज पार पडलेल्या कोरोनाच्या आढावा बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सुरुवातीला आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता आरटीपीसीआर चाचणीबरोबर अँटिजेन टेस्टवर आपण भर दिला जाणार आहे. राज्यात अजून मोठ्या प्रमाणात अँटिजेनच्या टेस्ट वाढवाव्या लागणार आहेत.

राज्यात कोरोना चाचण्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून रुग्णसंख्या 30 हजारापर्यंत जाऊ शकेल. त्यामुळे दरदिवशी दीड ते पावणे दोन लाख आरटीपीसीआर दरदिवशी करण्यात येणार आहे. त्यामुळे ताण पडणार आहे. अँटिजेनवर पॉझिटिव्ह आल्यास आरटीपीआर होणार नाही. किऑस्क द्वारे अँटिजेन कराव्यात, अशा सूचनाही संबंधितांना दिल्याची माहिती यावेळी टोपे यांनी दिली.

क्वॉरंटाईन कालावधी आता सात दिवसांवर

राज्यात अजूनही काहींनी दुसरा डोस घेतलेला नाही. त्यामुळे कोरोना रुग आढळल्यास त्यांना केन्यात येणाऱ्या क्वॉरंटाईनचा कालावधी वाढविण्यात आलेला आहे. त्यांना आता 7 दिवसांपर्यंत क्वॉरंटाईन केले जाणार आहे. ज्यांनी लस घेतली नाही त्यांना ज्या भाषेत समजत असेल त्यांना त्या भाषेत समजावून त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तसा निर्णय घेण्यात आला असल्याचे डॉ. टोपे यांनी सांगितले.

Leave a Comment