आता Driving Licence शिवाय चालवता येणार गाडी !!! सरकारने सुरु केली ‘ही’ सुविधा

Driving Licence
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Driving Licence : कोणतेही वाहन चालवण्यासाठी आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. जर आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर आपल्याला मोठा दंड भरावा लागू शकेल. मात्र आता आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स जवळ नसतानाही गाडी चालवता येईल. होय, आता असे करणे शक्य आहे.

Driving Licence: Apply Online for DL (New & Renewal), Documents, Fees

कारण आता ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) सोबत ठेवण्याची गरज भासणार नाही. यासाठी डिजिलॉकरचा वापर करता येईल. हे जाणून घ्या कि, देशात डिजिटलायझेशनला चालना देण्यासाठी सरकारकडून डिजीलॉकरची सुविधा सुरु करण्यात आली आहे. ज्यामध्ये आपल्याला लायसन्स, गाडीचे रजिस्ट्रेशन यांसारख्या अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी ठेवता येतील. तसेच हे सगळीकडे व्हॅलिड देखील असेल. जे दाखवल्यानंतर आपल्याकडून कोणताही दंड अथवा कारवाई केली जाणार नाही.

Ather 450X Gen 3 Price - Range, Images, Colours | BikeWale

इलेक्ट्रिक बाईक चालवत असाल तर…

हे ध्यानात घ्या कि, इलेक्ट्रिक बाईक चालवण्यासाठी फक्त शिकाऊ परवान्याची गरज असते. मात्र जर आपल्याकडे नॉन-गिअर वाहनाचे लायसन्स असेल तरी देखील इलेक्ट्रिक बाईक चालवता येईल. मात्र याव्यतिरिक्त इतर कोणतेही वाहन चालवण्यासाठी आपल्याकडे दुचाकी किंवा चारचाकी वाहनाचे पक्के लायसन्स (Driving Licence) असणे आवश्यक आहे.

Driving License: कितने प्रकार के होते हैं ड्राइविंग लाइसेंस, जानिए आपके लिए  कौन सा रहेगा बेस्ट! | types and categories of driving licenses in india for  bike car heavy vehicles | TV9 Bharatvarsh

लायसन्स नसेल तर…

जर आपण लायसन्स नसतानाही गाडी चालवत असाल तर पोलिसांकडून आपले वाहन जप्त केले जाऊ शकेल. यासोबतच 2 हजार ते 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला जाऊ शकेल. तसेच जर आपल्याकडे लायसन्स (Driving Licence) असेल तर आता डिजीलॉकरच्या मदतीने त्याची सॉफ्ट कॉपी ठेवता येईल. तसेच जर कधी पोलिसांकडून अडवणूक झाली तर ही सॉफ्ट कॉपी दाखवून सुटका करून घेता येईल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.mahatranscom.in/

हे पण वाचा :
Railway Budget 2023 : रेल्वेसाठी 2.4 लाख कोटींचे बजट, 2013 च्या अर्थसंकल्पापेक्षा 9 पटींनी जास्त
Share Market : अर्थसंकल्पाचा विमा कंपन्यांना फटका, शेअर्समध्ये झाली 14 टक्क्यांपर्यंतची घसरण
Budget 2023 : आता PF मधून पैसे काढल्यावर द्यावा लागणार कमी TDS, जाणून घ्या कोणाला होणार फायदा
Post Office च्या ‘या’ योजनेमधील डिपॉझिटच्या लिमिटमध्ये झाली वाढ !!!
New Tax Slab vs Old Tax Slab : जुन्या अन् नवीन स्लॅबमध्ये काय फरक आहे??? किती उत्पन्नावर किती टॅक्स द्यावा लागेल ते पहा