औरंगाबादहून इंदौर, नागपूरसाठी आता ‘फ्लाय बिग’

fly big
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – औरंगाबादहुन आणखी एका विमान कंपनीने विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने चाचपणी केली आहे. मुंबईसह इंदूर, पुणे, नागपूर या तिन्ही शहरांसाठी ‘फ्लाय बिग’ एअरलाइन्सच्या विमान सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

औरंगाबाद हुन आज घडीला एअर इंडिया आणि इंडिगो च्या माध्यमातून दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद साठी विमानसेवा उपलब्ध आहे. औरंगाबादहुन विमान सेवेचा विस्तार होत असतानाच कोरोनाच्या महामारीला सुरुवात झाली आणि यामुळे औरंगाबादच्या हवाई कनेक्टिव्हिटी वर मोठा परिणाम झाला. स्पाइस जेट ट्रुजेटची विमान सेवा बंद पडली. तब्बल दोन वर्षांनंतर कोरोना आटोक्यात आला आणि जनजीवन पूर्वपदावर आले. या सगळ्यात विमानसेवा ही आता पूर्वपदावर येत आहे. त्यासाठी विमानसेवा वाढीसाठी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण, लोकप्रतिनिधी, उद्योजक, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटी अनेकांकडून प्रयत्न सुरू आहेत.

विमान प्रवाशांचीही संख्या आता वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच फ्लाय बिग या विमान कंपनीने औरंगाबादहून विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने चाचपणी केली आहे. छोट्या 78 असली एटीआर विमानाद्वारे इंदूर, नागपूर आणि पुणे या शहरांना विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने ही चाचपणी करण्यात आल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.