नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ग्राहकांच्या सोयी लक्षात घेऊन एक निर्देश जारी केला आहे. ज्याअंतर्गत ATM मध्ये रोख रक्कम कमी झाल्यास RBI ने बँकांवर दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. ATM मध्ये रोख रक्कम उपलब्ध न झाल्याने लोकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी ATM ने हे पाऊल उचलले आहे.
दंड किती असेल ते जाणून घ्या ?
RBI ने म्हटले आहे की, “या संदर्भातील नियमांचे पालन न करणे गांभीर्याने घेतले जाईल आणि आर्थिक दंड आकारला जाईल.” ही तरतूद ATM मध्ये रोख रक्कम वेळेवर न टाकल्याबद्दल दंड करण्यात आला आहे.
पैसे नसल्यास ‘या’ क्रमांकावर तक्रार करा
ATM मध्ये पैसे नसल्यास, ग्राहक रिझर्व्ह बँकेच्या ट्विटर किंवा फेसबुक पेज व्यतिरिक्त 011 23711333 या फिन नंबरवर कॉल करू शकतात.
या दिवसापासून नवीन नियम लागू होतील
ही व्यवस्था 1 ऑक्टोबरपासून लागू होईल. 1 ऑक्टोबर 2021 पासून जर बँकेच्या ATM मध्ये रोख रक्कम मिळाली नाही तर बँकांना दंड भरावा लागू शकतो. RBI ने एका परिपत्रकात म्हटले आहे की,”ATM मध्ये रोख रक्कम न ठेवल्यास दंड आकारण्यामागचा उद्देश लोकांच्या सोयीसाठी या मशीनमध्ये पुरेसे पैसे आहेत याची खात्री करणे आहे.”
RBI चे नवीन नियम काय आहेत ते जाणून घ्या
एका महिन्यात 10 तासांपेक्षा जास्त ATM मध्ये रोख रक्कम नसल्यास संबंधित बँकांना RBI हा दंड लावेल. ही व्यवस्था 1 ऑक्टोबर 2021 पासून लागू होईल. यासाठी आरबीआयने बँक/व्हाईट लेबल ATM ऑपरेटरला एटीएममध्ये रोख रकमेची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यांची सिस्टीम मजबूत करण्यास सांगितले आहे. जून 2021 अखेर देशभरातील विविध बँकांमध्ये 2,13,766 ATM होते.
रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की ATM मध्ये रोख रक्कम नसल्यास, सिस्टम जनरेटेड स्टेटमेंट द्यावे लागेल. हे स्टेटमेंट RBI च्या इश्यू डिपार्टमेंटला पाठवले जाईल ज्या अंतर्गत ATM येते. या नियमाचे पालन न केल्यास गंभीरतेने घेतले जाईल आणि दंड आकारला जाईल.