हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अँपल कंपनीचा iPhone घेण्याकडे तरुण पिढीचा कल जास्त आहे. आता लवकरच भारतात आयफोन तयार होणार आहे. यासोबतच कंपनीत नोकरीच्या संधी देखील मोठ्या उपलब्ध होणार आहे. तैवान येथील बहुराष्ट्रीय फॉक्सकॉन कंपनी एप्रिल 2024 पासून कर्नाटकातील देवनहल्ली येथील प्लांटमध्ये आयफोन युनिट्सचे उत्पादन सुरू करणार आहे. याबाबतची माहिती कर्नाटकचे मंत्री एम.बी. पाटील यांनी दिली आहे. ही प्रक्रिया व्यवस्थित सुरु करण्यासाठी राज्य सरकार जमीन 31 जुलैपर्यंत कंपनीला देणार आहे. असेही त्यांनी म्हंटल.
देवनहळ्ळी या ठिकाणी असलेली आयटीआयआरमध्ये ओळखण्यात आलेली 300 एकर जमीन 1 जुलैपर्यंत सुपूर्द केली जाईल. यासोबतच 5 एमएलडी पाणी, दर्जेदार वीजपुरवठा, रस्ते जोडणी आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची खात्री सरकार करेल. असं बैठकी वेळी एम.बी. पाटील म्हणाले. हा प्रकल्प 13 हजार 600 कोटी रुपयांचा असुन या प्रकल्पातून तब्बल 50 हजार नोकऱ्या मिळतील अशी आशा आहे.
कंपनीला कर्मचार्यांमध्ये अपेक्षित कौशल्य सेट करणे गरजेचे आहे. याचबरोबर पात्र उमेदवारांना रोजगारक्षम बनवण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम योग्यरित्या पार पाडण्यासाठी पावले उचलली जातील. दरम्यान, फॉक्सकॉनने कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळाला (KIADB) जमिनीच्या किमतीच्या 30 टक्के म्हणजेच 90 कोटी रुपये आधीच दिले आहेत. एकूण ३ टप्प्यांत प्रकल्प पूर्ण करून दरवर्षी 20 दशलक्ष युनिट्सचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.