आता ऑनलाइन घेतलेली डिग्रीदेखील रेग्युलरच्या बरोबरीची; UGC कडून नव्या नियमाची घोषणा

0
156
UGC
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील लाखो संख्येने ऑनलाइन पदवी आणि डिस्टेंस लर्निंग पदवीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता मान्यताप्राप्त संस्थांकडून मिळवलेली डिस्टेंस लर्निंग डिग्री आणि ऑनलाइन अभ्यासक्रमांची डिग्री सुद्धा रेग्युलर डिग्रीच्या बरोबरीनेच मानले जाईल अशी घोषणा विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजेच UGC ने केली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) सचिव रजनीश जैन यांनी याबाबत सांगितले की, 2014 च्या यूजीसीच्या अधिसूचनेनुसार ज्या पद्धतीने विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधून पारंपारिक पद्धतीने बॅचलर आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त केली जाते. त्याचप्रमाणे डिस्टेंस लर्निंगशी संबंधित विद्यापीठांनाही मान्यता दिली जाईल. याशिवाय उच्च शैक्षणिक संस्थांच्या ऑनलाइन अभ्यासक्रमांनाही तितकेच महत्त्व मिळणार आहे.

असे म्हटले जाते की एकूण भारतीय विद्यार्थ्यांपैकी 25 टक्के विद्यार्थी ऑनलाइन किंवा डिस्टेंस लर्निंग अभ्यासक्रमांमध्ये नोंदणीकृत आहेत. यातील काही लोक असे आहेत की ते काम करत असताना अभ्यास करत आहेत. रजनीश जैन यांनी सांगितले की, हा निर्णय यूजीसी (ओपन अँड डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्राम आणि ऑनलाइन प्रोग्राम) च्या नियमावलीच्या नियम 22 अंतर्गत घेण्यात आला आहे.

CUET-UG परीक्षेचा निकाल 15 सप्टेंबरपर्यंत जाहीर होण्याची अपेक्षा 

यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी सांगितले की, संयुक्त विद्यापीठ प्रवेश परीक्षा (CUET)-UG चा निकाल 15 सप्टेंबरपर्यंत जाहीर केला जाईल. विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) अध्यक्ष कुमार यांनी सांगितले की, CUET-UG ची पहिली आवृत्ती, जी पदवीपूर्व प्रवेशासाठी प्रवेशद्वार मानली जाते, जुलैमध्ये विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी परीक्षा सुरू झाली होती आणि 30 ऑगस्ट रोजी संपली. 60% लोक परीक्षेला बसले होते असेही त्यांनी संगितले .