आता फक्त एका मिस्ड कॉलद्वारे मिळेल LPG कनेक्शन, त्यासाठी काय करावे लागेल ‘हे’ समजून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आता नवीन LPG कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला ऑफिसमध्ये जावे लागणार नाही. एक काळ असा होता की, लोकांना LPG कनेक्शन घेण्यासाठी महिनोन् महिने वाट पाहावी लागत होती आणि हे काम सहजासहजी देखील होत नव्हते. मात्र आता तुम्हाला LPG कनेक्शनसाठी फक्त एक मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे. यानंतर तुम्हाला LPG चे कनेक्शन सहज मिळेल.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने ट्विट करून ही माहिती दिली आहे की आता ग्राहक मिस्ड कॉल देऊनही गॅस कनेक्शन घेऊ शकतात. आपण याचा फायदा कसा घेऊ शकता हे समजून घेऊया.

मिस्ड कॉल करावा लागेल
IOCL ने दिलेल्या माहितीनुसार, आता कनेक्शनसाठी ग्राहकांना 8454955555 वर मिस्ड कॉल करावा लागेल आणि कंपनीचे कर्मचारी त्यांच्याशी संपर्क साधतील. यानंतर तुम्हाला एड्रेस प्रूफ आणि आधारद्वारे गॅस कनेक्शन मिळेल. या नंबरद्वारे गॅस रिफिल देखील केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला फक्त रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून कॉल करावा लागेल.

जुने कनेक्शन एड्रेस प्रूफ म्हणून ग्राह्य धरले जाईल
तुमच्या कुटुंबातील कोणाचे गॅस कनेक्शन असेल आणि पत्ता एकच असेल, तरीही तुम्ही गॅस कनेक्शन घेऊ शकता. मात्र, यासाठी तुम्हाला एकदा गॅस एजन्सीमध्ये जाऊन जुन्या गॅस कनेक्शनशी संबंधित कागदपत्रे दाखवून त्याची पडताळणी करून घ्यावी लागेल. त्यानंतरच तुम्हाला त्या पत्त्यावर गॅस कनेक्शन मिळेल.

अशाप्रकारे LPG सिलेंडर बुक करा
1. तुमच्या रजिस्टर्ड क्रमांकावरून 8454955555 वर मिस्ड कॉल द्या.
2. LPG सिलेंडर भारत बिल पेमेंट सीसीट्म (BBPS) द्वारे देखील रिफिल केले जाऊ शकतात.
3. बुकिंग इंडियन ऑइलच्या अ‍ॅप किंवा https://cx.indianoil.in द्वारे देखील केले जाते.
4. ग्राहक 7588888824 वर व्हॉट्सअ‍ॅप मेसेजद्वारे सिलेंडर भरून घेऊ शकतात.
5. याशिवाय 7718955555 या क्रमांकावर SMS किंवा IVRS करूनही बुकिंग करता येईल.
6. Amazon आणि Paytm द्वारे देखील सिलेंडर भरता येतो.

Leave a Comment