आता आधार कार्डावरुन काही मिनिटांतच बनवले जाईल पॅनकार्ड, यासाठीची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने पॅनकार्डचा अनिवार्य कागदपत्रांमध्ये समावेश केला आहे. आता पॅन कार्डशिवाय तुम्ही बँकेत खाते उघडण्यास सक्षम राहणार नाही किंवा तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार नाही. मोठ्या व्यवहारासाठी पॅनकार्डही अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही पॅनकार्ड बनवले नसेल तर त्वरित उशीर न करता आपले पॅनकार्ड तयार करा. यापूर्वी पॅनकार्ड बनविण्यासाठी तुम्हाला लांबलचक फॉर्म भराव लागायचा, मात्र आता एका क्लिकवर काही मिनिटांतच आपले पॅनकार्ड तयार होऊन आपल्या आपल्या हातात येईल. होय, तुम्ही बरोबर समजला आहात.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आता अशा सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत की, आपल्या आधार कार्डच्या माध्यमातून अवघ्या 10 मिनिटात आपले इन्स्टंट पॅन फ्रीमध्ये ऑनलाइन तयार होईल. या इन्स्टंट ई-पॅन कार्ड अ‍ॅप्लीकेशन फॉर्ममध्ये आपल्याला फक्त आपला आधार क्रमांक टाकणे आवश्यक आहे. त्यानंतर e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी OTP आपल्या लिंक केल्या गेलेल्या मोबाइल फोन नंबरवर पाठविला जाईल.

ज्याप्रमाणे Unique Identification Authority of India (UIDAI) हे आधार कार्ड जारी करतात. त्याचप्रमाणे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पॅनकार्ड जारी करतो. यात 10 अंकांचे अल्फान्यूमेरिक (digit alphanumeric) असते. पॅन कार्डसाठी अर्ज करणाऱ्यांना 10 मिनिटांतच पण कार्ड पीडीएफ फॉरमॅटमध्ये उपलब्ध करून दिले जाईल.

Step 1- इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून पॅनकार्ड मिळविण्यासाठी तुम्हाला ई-फाईलिंग पोर्टलवर जाऊन ‘Instant PAN through Aadhaar वर क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर ”Get New PAN” निवडावे लागेल. आपणास आधार क्रमांक विचारला जाईल आणि रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर OTP पाठविला जाईल. OTP व्हॅलिडेशन नंतर तुम्हाला ई-पॅन देण्यात येईल.

Step 2- यात अर्जदाराला पॅनकार्डची कॉपी पीडीएफ फॉरमॅटमध्ये मिळते, ज्यात QR Code असतो. या क्यूआर कोडमध्ये, अर्जदाराचे डेमोग्राफिक डिटेल्स आणि फोटो असतो. अर्ज करतांना, रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर 15 अंकी नंबर पाठविला जातो. या नंबरच्या मदतीने e-PAN डाऊनलोड करता येईल. याची एक कॉपी अ‍ॅप्लिकेशनच्या ईमेल आयडीलाही पाठविली जाते. मात्र, आधारसह ईमेल आयडी रजिस्टर करणे अनिवार्य आहे. नुकताच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने e-PAN शी संबंधित नियमात बदल करून हे सुलभ केले आहे.

Step 3- पॅन कार्ड NSDL आणि UTITSL द्वारे देखील दिले जाते. तथापि, या दोन युनिट्सकडून पॅनकार्ड मिळविण्यासाठी तुम्हाला निश्चित शुल्क भरावे लागेल. याउलट इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या (Income Tax Department) वेबसाइटवर पॅन कार्ड पूर्णपणे फ्री मध्ये उपलब्ध आहे.

https://t.co/myl3jgiEhG?amp=1

Step 4- इन्स्टंट पॅन सुविधेअंतर्गत (Instant PAN Facility) तुम्हाला कोणताही तपशील भरायचा नाही. महत्वाची माहिती फक्त आपल्या आधारवरून वरून गोळा केली जाते. याद्वारेच, पॅन कार्ड आणि आधार कार्ड ऑटोमॅटिकली लिंक केले जातात. लिकिंग साठी आपल्याला काही करण्याची आवश्यकता नाही.

https://t.co/nC8EbOCflv?amp=1

Step 5- इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सांगितले की, इन्स्टंट पॅनसाठी फक्त 10 मिनिटे लागतात. आतापर्यंत 6.7 लाख लोकांचे इन्स्टंट पॅन तयार केले गेले आहे.

https://t.co/uDxeICqFKr?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment