औरंगाबाद | कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एपीआय कॉर्नर परिसरातील हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या पंप चालकावर शुक्रवारी पथकाने केलेल्या दंडात्मक कारवाईचा निषेध पेट्रोल पंप असोसिएशनने केला आहे. तसेच अशा कारवाया टाळण्यासाठी शनिवारपासून दिनांक 22 सकाळी 7 ते 11 वाजे दरम्यान पंप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास यांनी शुक्रवारी दिनांक 21 पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे पंप चालक सरदार सिंग अँड सन्स यांना कोविंड नियमाचे यांना कोविंड नियमांचे पालन न केल्याबद्दल 25 हजारांचा दंड लावला
मात्र पावतीवर विशिष्ट नियम तेलंगणाचा कोणताही उल्लेख केलेला नाही विशेष म्हणजे 17 एप्रिल 2021रोजी पोलिस आयुक्तांनी अतिआवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहनांना दुपारी 1 वाजेपर्यंत पेट्रोल विक्री बाबत परवानगी दिली आहे. पंपावरील गर्दी तसेच कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आधी प्रकार होऊ नये ,यासाठी पोलिस बंदोबस्त देण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले होते.
अद्याप पर्यंत बंदोबस्त दिला नाही असे असतानाही कारवाई होत असेल तर आम्हाला कृपया पंप सुरू ठेवण्याची वेळ सांगावीत असे लेखी आदेश काढावेत अशी मागणी केली अनावश्यक दंड भरावा लागू नये यासाठी शनिवारपासून आम्ही फक्त सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत चालू ठेवू असे अब्बास यांनी स्पष्ट केले.