आता शशिकांत शिंदे रणांगणात : म्हणाले, सहन करण्याची सीमा संपली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सरकार ज्या पध्दतीने काम करत आहे. त्याचीच अमंलबजावणी सातारा जिल्ह्यात होत असल्याचे नाईलजाने म्हणावे लागते. जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रमुख कोणाच्यातरी दबावाखाली काम करत आहेत. प्रशासन दबावाखाली काम करत आहे, ते केवळ सातारा जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात पहायला मिळत आहे. आज खालच्या पातळीवरील व वाईट पध्दतीने राजकारण होवू लागले आहे. आताच्या लोकांना सत्तेची मस्ती अन् त्याच्या दबावाखाली अधिकारी काम करत असतील तर ते चुकीचे आहे. नवीन एसपी, कलेक्टर आणि सीईअो आले. आता सहन करण्याची सीमा संपलेली आहे. आता मी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. आता डोक्यावरून पाणी जायला लागले आहे. त्यामुळे शशिकांत शिंदे रणांगणात उतरणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे नेते शशिकांत यांनी दिला आहे.

कुमठे येथे घडलेल्या प्रकाराबाबत मी पोलिसांकडे न्याय मागायला जाणार आहे. त्यांनी वेळ दिल्यानंतर मी भेटणार आहे. कुमठे येथील प्रकाराबाबत गुन्हा दाखल झाला. जो माणूस पैसे वाटायला आहे, त्याचा गावाशी संबध नाही. मतदानासाठी पैसे वाटल्याचे कबुल केले त्याला अद्याप अटक नाही. परंतु आमच्या लोकांना लगेच अटक केली.

Shashikant Shinde : कुमठे प्रकरणी मी स्वतः गुन्हा दाखल करण्यासाठी जाणार; BJP-NCP राजकारण तापलं

कुमठ्याची टाकी पडली तर गुन्हा दाखल होतो. तोच न्याय मेडिकल बाबत निर्णय का नाही. मी स्वतः गुन्हा दाखल करायला जाणार आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही तर चारही लोकांना दरडोखोर म्हणून कोर्टात खेचणार आहे. त्यांनी दरोड्यात सामील झाले आहेत का हे त्यांनी खुलासा करावा. मेडिकल काॅलेजच्या इमारतीवर दिवसाढवळ्या दरोडा टाकून 100 गाड्या, पोकलॅन लावून. सरळसरळ 1 कोटी घेतले गेले. साताऱ्याचा हा विषय अधिवेशनात मांडणार आहे. आता सहन करण्याची सीमा संपलेली आहे. त्यामुळे मी सातारा कलेक्टर कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत हालणार नाही.

कोरेगाव तालुक्यात 80 टक्के ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचा विजय
कोरेगाव तालुक्यात 27 ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे बहुमत आले आहे. त्यापैकी 6 ग्रामपंचयातीत सरपंच पद आमचे नसले तरी बहुमत आमचे आहे. कोरेगाव तालुक्यात 80 टक्के ग्रामपंचायती या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या विजयी झाल्या आहेत.