Business Idea : थंडीच्या दिवसांत ‘हा’ व्यवसाय तुम्हाला कमवून देईल बक्कळ पैसे; House Wife असाल तर सुवर्णसंधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : आपल्यातील अनेकांना नोकरी ऐवजी व्यवसाय स्वतःचा सुरू करायची ईच्छा असते. कारण व्यवसायाद्वारे कमाईच्या चांगल्या संधी उपलभड होतात. जर आपणही एखादया व्यवसायाच्या शोधात असाल तर थंडीच्या दिवसात लोकरीच्या कापडाचा व्यवसाय सुरू करून चांगला नफा मिळवू शकाल. हे लक्षात घ्या कि, थंडीच्या हंगामात जॅकेट, स्वेटर, शाली अशा सर्वच उत्पादनांना भरपूर मागणी असते. अशातच आता थंडीचा हंगाम देखील सुरू झाला आहे. थंडीच्या मोसमात थंडीपासून बचाव करण्यासाठी लोकं उबदार कपडे वापरतात. त्यामुळे या 2-3 महिन्यांमध्येच मोठी कमाई करता येऊ शकेल. यामध्ये किरकोळ विक्रीप्रमाणेच घाऊक विक्री करूनही चांगले उत्पन्न मिळवता येईल.

How to Wash Your Woollen Sweater Without Shrinking It | Get Set Clean | Get Set Clean

लोकरीच्या कपड्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याकडे असलेल्या कपड्यांमध्ये व्हरायटी असली पाहिजे. आपल्याकडे जितकी व्हरायटी असेल लोकं तितके जास्त कपडे खरेदी करतील. अशा परिस्थितीत उबदार कपड्यांच्या व्यवसायातून हिवाळ्यामध्येच लाखो रुपयांची कमाई करता येईल. याबरोबरच आपल्या सोयीनुसार हे कपडे ऑनलाइन किंवा ऑफलाइनही विकून पैसे मिळवता येतील. Business Idea

Want to control your spending? Try the 30-Day Rule | Mint

किती पैसे लागतील ???

छोट्या प्रमाणावर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 2 ते 3 लाखांची गुंतवणूक पुरेशी ठरेल. मात्र जर जास्त प्रमाणात व्यवसाय करायचा असेल तर 5 ते 7 लाख रुपये लागतील. या व्यवसायासाठी लागणारे उबदार कपडे आपल्याला पंजाब, हरियाणा, राजस्थान किंवा उत्तर प्रदेश सारख्या ठिकाणांहून ऑर्डर करता येतील. हे जाणून घ्या की, लोकरीच्या कपड्यांच्या उत्पादनात ही सर्व राज्ये आघाडीवर आहेत. त्याच प्रमाणे आपल्या शहरात देखील उबदार कपड्यांचे घाऊक विक्रेते सापडतील. Business Idea

Woolen Clothes: ऊनी कपड़ों की देखभाल ऐसे करें, कपड़े रहेंगे नए! - winter tips how to wash woolen clothes

लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

इथे लक्षात घ्या की, लोकरी आणि उबदार कपड्यांसाठी ओलसर जागा वाईट आहे. त्यामुळे गोदाम असलेली जागा कोरडी असावी. कारण ओलाव्यामुळे लोकरीच्या कपड्यांमध्ये बुरशी येते. त्यामुळे नुकसान होण्याची जास्त भीती असते. या व्यवसायातील नफा हा हंगामावर अवलंबून असतो. या व्यवसायात साधारणपणे 30 ते 40 टक्के नफा मिळू शकेल. Business Idea

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/

हे पण वाचा :
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 247 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा
Amazon iPhone Deal मध्ये स्वस्तात आयफोन खरेदी करण्याची संधी, ‘या’ रंगाच्या व्हेरिएंटवर मिळेल सर्वाधिक सूट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, आजचे दर तपासा
Samsung Galaxy S21 FE : अर्ध्याहून कमी किंमतीत खरेदी करा सॅमसंगचा हा हाय-एंड स्मार्टफोन,
ATM Transaction फेल झाले मात्र खात्यातून पैसे कापले गेले, बँकेकडून अशा प्रकारे मिळवा नुकसानभरपाई