नवी दिल्ली । देशातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSMEs) ला बळकटी देण्यासाठी आणि फंडिंग करण्यासाठी खासगी क्षेत्रातील येस बँकने (Yes Bank) येस एमएसएमई इनिशिएटिव्ह (YES MSME initiative) सुरू केला आहे. याअंतर्गत येस बँक एमएसएमई क्षेत्रातील कंपन्यांना सहजपणे कर्ज उपलब्ध करुन देईल. बँकेने असे म्हटले आहे की, यामुळे एमएसएमईच्या खाजगी आणि व्यवसायाच्या गरजा पूर्ण होतील. तसेच नवीन काळातील उद्योजकांना त्यांची क्षमता वाढविण्यात मदत करतील. या एमएसएमई उपक्रमामुळे लघु उद्योगांना आपला व्यवसाय वाढविण्यात मदत होईल.
येस बँकेच्या या उपक्रमांतर्गत स्टार्टअप्सना (Startups) काहीही तारण न ठेवता पाच कोटी रुपयांपर्यंतचे मोफत कर्ज (collateral free loans) देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच बँकेने एमएसएमईंसाठी कर्ज प्रक्रियासाठीची वेळही (Loan Processing Time) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणजेच आता बँक त्वरित कर्ज देईल. याव्यतिरिक्त, बँकेने प्री-अप्रूव्ड कमर्शियल क्रेडिट कार्ड्स, एडवायजरी आणि वेल्थ मॅनेजमेंट सोल्यूशन्ससह एमएसएमईंसाठी डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर्सची सुविधा जाहीर केली आहे.
अर्थव्यवस्थेत एमएसएमईचा 30% वाटा आहे
केंद्रीय एमएसएमई मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, हे क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा आधार आहे. ते म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये एमएसएमई क्षेत्राचा 30 टक्के वाटा आहे. या क्षेत्रात आतापर्यंत 11 कोटी रोजगार निर्माण झाले आहेत. या क्षेत्रात गुंतवणूकीची वेळ आवश्यक आहे. आम्हाला आशा आहे की, उद्योग आणि सरकारच्या मदतीने या क्षेत्राचा विस्तार होईल.
या एमएसएमई उपक्रमाची खास वैशिष्ट्ये
> येस बँक एमएसएमईंना कर्ज घेण्याची आणि कस्टमाइज्ड फंडिगसाठी सोपा चॅनेल प्रदान करेल. या माध्यमातून एमएसएमईंना सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. यासह आपला आयपीओ आणण्यात बँक एमएसएमईला मदत करेल.
> एमएसएमई आणि स्टार्टअप्सला करंट अकाउंटला सेविंग्स अकाउंटमध्ये आणि फिक्स्ड डिपॉझिट अकाउंटमध्ये रूपांतरित करण्याची सुविधा मिळेल. बचतीस चालना देण्यासाठी YES Premia, YES First Business यांसारखे लॉयल्टी रिवॉर्ड प्रोग्रॅम सुरू केले जातील.
> या उपक्रमांतर्गत लाइफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स सारख्या इंडिविजुअल इन्शुरन्स सह बिझनेस इन्शुरन्स देखील उपलब्ध असेल. याशिवाय बँका वेल्थ आणि इंवेस्टमेंट सोल्यूशन्स देतील.
> स्टार्टअप्सना काहीही तारण न ठेवता 5 कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची सुविधा मिळेल. त्यांना फिनटेक पार्टनरशिप आणि डिजिटल पेरोल सोल्यूशन्स प्रदान केल्या जातील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.