‘हा’ विषय आता पुरे झाला! राज्यापुढे त्याहून जास्त महत्वाचे प्रश्न; सुप्रिया सुळे कडाडल्या

कोल्हापूर । राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची आता तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. यानंतर आता खासदार आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपलं मत व्यक्त केलंय. ‘हनी ट्रॅप’ ही महाराष्ट्राची संस्कृती नसून हा विषय आता पुरे झाला, राज्यासमोर त्याहून जास्त महत्वाचे प्रश्न असून सर्वांनी त्यावर लक्ष द्यावे, असे सुळेंनी म्हटले. शुक्रवारी कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी जाण्यापूर्वी त्या शासकीय विश्रामधामवर पत्रकारांशी बोलत होत्या.

यावेळी धनंजय मुंडे यांच्या विरोधातील तक्रार रेणू शर्मा या महिलेने मागे घेतली त्याअनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर खासदार सुळे म्हणाल्या, ”व्यक्तिगत आयुष्यात काय घडले हे शोधण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. त्यामुळे हा विषय आता पुरे झाला, राज्यासमोर त्याहून जास्त महत्वाचे प्रश्न असून सर्वांनी त्यावर लक्ष द्यावे,” असेही सुळेंनी म्हटले. दरम्यान, जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्री व्हावे वाटते, या वक्तव्यावर प्रत्येक कार्यकर्त्याला मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. त्यामुळे अजित पवार यांनीही त्यात गैर काय असे म्हटले आहे, याची आठवणही सुप्रिया सुळेंनी करुन दिली.

दरम्यान, धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्यावर रेणू शर्माने बलात्काराचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा प्रदेश महिला मोर्चातर्फे सोमवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. मात्र, आता बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माने धनंजय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मात्र संतप्त प्रतिक्रिया देत तक्रार मागे घेणाऱ्या रेणू शर्मांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.त्यामुळं आता याप्रकरणावर पडदा पडला असं म्हणता येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like