WhatsApp फुकट वापरायचे दिवस संपले; आता मोजावे लागणार पैसे

Whatsapp Use Need Money
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या WhatsApp चे यूजर्स हे प्रचंड मोठे आहेत. त्यामुळे व्हाट्सअप हे आपल्या यूजर्ससाठी नेहमीच काही ना काही नवीन फिचर आनत असते. आणि त्याचा फायदा हा यूजर्सला होतो. महत्वाचे म्हणजे WhatsApp हे वापरायला अगदी फ्री वापरता येत असल्यामुळे एकमेकांशी संवाद साधता येणे सोपे जाते. मात्र आता नवीन वर्षात असे होणार नाही. 2024 मध्ये व्हाट्सअप चॅटचा बॅकअप घेण्यासाठी यूजरला पैसे मोजावे लागणार आहेत.

WhatsApp सह Google One द्वारे अतिरिक्त स्टोरेज खरेदी करण्याचा करावा लागेल विचार

व्हाट्सअप ने पूर्वी Google Drive वर त्यांच्या WhatsApp चॅटचा बॅकअप घेण्याची परवानगी दिलेली आहे. मात्र आता नवीन वर्षात यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. तसेच पहिल्या सहा महिन्यात चॅट बॅकअप युजर्सच्या Google ड्राइव्ह स्टोरेज मर्यादेमध्ये समाविष्ट करणे सुरू होईल. याचा परिणाम हा 15 GB वर अवलंबून आहेत. त्यांच्यावर होणार आहे. त्यामुळे चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी जे यूजर्स Google Drive वर अवलंबून आहेत त्यांना आता WhatsApp सह Google One द्वारे अतिरिक्त स्टोरेज खरेदी करण्याचा विचार करावा लागणार आहे.

किती लागणार पैसे?

व्हाट्सअपच्या नवीन निर्णयामुळे चॅट बॅकअपसाठी वापरकर्त्यांना पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामध्ये जर तुम्ही Google One आणि Google Drive चे सदस्य असाल तर , मासिक आणि वर्षीक अश्या स्वरूपात तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत. त्यामध्ये मासिक खर्चामध्ये साधारणपणे (100GB) £1.59 / $1.99, मानक (200GB) £2.49 / $2.99 ​​आणि प्रीमियम (2TB) £7.99 / $9.99 यांचा समावेश आहे. तर वार्षिक मध्ये वापरकर्त्यांना मूळ (100GB) योजनेसाठी £15.99 / $19.99, मानक (200GB) योजनेसाठी £24.99 / $29.99 आणि प्रीमियम (2TB) योजनेसाठी £79.99 / $99.99 द्यावे लागतील. याबद्दलची किंमत ही अजून भारतात जाहीर करण्यात आली नाहीये.