नवी दिल्ली । तुम्हालाही पूर्वी कमी रेशन मिळत असेल किंवा तासनतास लांबलचक लाईनमध्ये ताटकळत थांबावे लागत असेल तर आता तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. एका नवीन उपक्रमांतर्गत ग्रेन एटीएम (Grain ATM) बसविण्यात आले आहेत. म्हणजेच आता तुम्ही एटीएमच्या मदतीने अवघ्या 5 मिनिटात धान्य घेऊ शकता. देशातील हे पहिलेच असे एटीएम आहे, जेथून पैशांऐवजी धान्य मिळेल.सध्या हे एटीएम फक्त हरियाणाच्या गुरुग्राममध्ये स्थापित केले गेले आहे.
या एटीएमचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्याला कमी रेशन मिळण्याची तक्रार पूर्णपणे संपली आहे. हरियाणाच्या गुरुग्राम जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून हे देशातील पहिले ‘ग्रेन एटीएम’ उभारण्यात आले आहे.
आपण किती धान्य काढू शकता?
या एटीएम मशीनद्वारे तुम्ही पाच ते सात मिनिटांत एकावेळी 70 किलो धान्य काढू शकता. गुरुग्रामच्या फारूक नगरमध्ये स्थापन केलेले हे बँक एटीएमच्या धर्तीवर काम करेल. अंगठा (पंच टॅक्स) लावून ग्राहकांना येथून धान्य मिळू शकेल.
तीन प्रकारचे धान्य मिळेल
या धान्य मशिनमध्ये टच स्क्रीनसह बायोमेट्रिक सिस्टीम देखील इन्स्टॉल केली गेली आहे. या मशीनमधून धान्य काढून घेण्यासाठी लाभार्थ्यास आधार, रेशन कार्ड नंबर द्यावा लागेल. त्याचवेळी या मशीनद्वारे तीन प्रकारची धान्ये काढता येतील, ज्यात गहू, तांदूळ आणि बाजरीचा समावेश आहे.
धान्य आपोआप बॅगमध्ये भरले जाईल
हे एक ऑटोमैटिक मशीन आहे, जे बँकेच्या एटीएमसारखे काम करते. बायोमेट्रिकच्या मदतीने आपण त्यातून धान्य काढू शकाल. बायोमेट्रिकद्वारे खात्री करून घेतल्यानंतर सरकारने स्वतःच लाभार्थ्यांना ठरविलेले अन्नधान्य मशीन अंतर्गत बसविलेल्या बॅगमध्ये भरले जाईल.
युनायटेड नेशन्सच्या वर्ल्ड फूड प्रोग्राम अंतर्गत स्थापित होणाऱ्या या मशीनला ऑटोमेटेड, मल्टी कमोडिटी, धान्य डिलीव्हरी मशीन असेही म्हणतात. त्याच वेळी अधिकारी अंकित सूद म्हणाले की,”या मशीनमुळे धान्यात काही गडबड होणार नाही.”
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा