आता फक्त एका कॉलवर रद्द करता येईल रेल्वे तिकीट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । लॉकडाऊन आणि कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे रेल्वेने आपल्या नियमित सेवा बंद ठेवल्या आहेत. फक्त स्पेशल ट्रेन याकाळात सुरु आहेत. त्यामुळं आधीच आरक्षित असलेली नियमित रेल्वे गाड्यांची तिकीट रद्द करण एक मोठे आव्हान झाले असून तिकिटाचा परतवा सुद्धा मिळण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. परंतु आता आपल्याला त्याबद्दल फार काळजी करण्याची आवश्यकता नाही. आता आपण फक्त एका कॉलद्वारे आपले तिकीट रद्द करू शकता. परताव्याबद्दल देखील काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला तिकिटाची रक्कमही सहज मिळेल.

असे करा तिकीट रद्द
वास्तविक, आरक्षण काऊंटरवर बुक करणार्‍यांना फोनद्वारे तिकिटे रद्द करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अशा प्रवाशांना कॉलद्वारे तिकिटे रद्द करण्याची सुविधा देण्यात आली आहे. रात्रीचा वेळ असल्याने आणि तिकिट आरक्षणाचे काउंटर बंद केल्यावर बहुतेक वेळा लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो. रात्री उशिरा रेल्वे आल्यास प्रवाशांना काउंटरवर जाण्यासाठी आणि तिकिट रद्द करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. या समस्येसाठी रेल्वेने कॉल करुन तिकीट रद्द करण्याची सुविधा सुरू केली. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना रेल्वेच्या चौकशी क्रमांक १३९ वर कॉल करावा लागेल. लक्षात ठेवा की आपण हा कॉल केवळ नोंदणीकृत मोबाइल नंबरसह केला पाहिजे. म्हणजे तिकिट आरक्षणाच्या वेळी दिलेला क्रमांक हवा.

OTP द्वारे होईल तिकीट रद्द
आमच्या सहयोगी zeebiz.comच्या मते, कॉल केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रिझर्व्ह तिकीटाचा पीएनआर नंबर द्यावा लागेल. यानंतर, रेल्वे आपल्या नोंदणीकृत क्रमांकाची पुष्टी करेल. रेल्वे तिकीट रद्द करण्याची प्रक्रिया सुरु करण्यासाठी आपल्या मोबाइलवर एक वेळचा पासवर्ड (ओटीपी) पाठविला जाईल. आपल्याला ही माहिती कॉलवरच द्यावी लागेल. यानंतर, रेल्वे आपले तिकिट रद्द होईल.

तिकीट परतावा कसा मिळेल?
तिकीट रद्द झाल्यानंतर, पुढील प्रक्रिया परतावा आहे. आपल्याला परताव्याची प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही. तिकिट रद्द झाल्यानंतर तुम्हाला रेल्वेच्या आरक्षण काऊंटरवर जावे लागेल. तिकिट रद्द करण्याच्या माहितीसह ओटीपीला सांगून आपल्याला काउंटरकडून परतावा मिळेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment