नवी दिल्ली । आपण कोरोना काळात (Coronavirus Pandemic) गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर आपल्यासाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. आता आपण घर बसल्या NPS खाते उघडू शकता. वाढती कोरोनाची प्रकरणे लक्षात घेता, पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) ने ऑनलाइन आधार e-KYC मार्फत नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) अंतर्गत खाते उघडण्याची सुविधा दिली आहे. आतापर्यंत eNPS अंतर्गत रजिस्ट्रेशन ऑफलाइन आधार e-KYC किंवा पॅन आणि बँक खात्याद्वारे केला जात होता. जिथे आपण सहजपणे खाते उघडू शकता आणि कमी गुंतवणूक करून भरपूर नफा मिळवू शकता.
आपण अशा प्रकारे खाते उघडू शकता
1. आधारचा वापर करुन ऑनलाईन NPS खाते उघडण्यासाठी, ग्राहकांनी eNPS पोर्टलला भेट द्यावी.
2. सब्सक्राइबर्सना “राष्ट्रीय पेन्शन सिस्टम” वर क्लिक करावे लागेल आणि नंतर “रजिस्ट्रेशन” पर्यायावर क्लिक करावे लागेल.
3. आता खाते उघडण्याची कॅटेगिरी “पर्सनल सब्सक्राइबर” किंवा “कॉर्पोरेट सब्सक्राइबर” यापैकी एकामधून निवडावी लागेल. या व्यतिरिक्त, आपल्याला “भारतीय नागरिक” किंवा “भारतीय रहिवासी (NRI)” किंवा “विदेशातील नागरिक (OCI)” निवडावे लागेल.
4. यानंतर तुम्हाला “आधार ऑनलाईन / ऑफलाइन केवायसी” पर्याय निवडावा लागेल. याशिवाय खाते उघडण्यासाठी ‘टीयर टाईप’ निवडणे आवश्यक आहे.
5. आधार ऑनलाइन प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी, ग्राहकांना UIDAI ने दिलेला आधार (12 अंक) किंवा व्हर्च्युअल आयडी (16 अंक) क्रमांक निवडावा लागेल आणि जनरेट ओटीपी वर क्लिक करावे लागेल.
6. सब्सक्राइबर्सना जनरेट OTP वर क्लिक करावे आणि रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर मिळालेला OTP सबमिट करावा लागेल.
7. NPS रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करण्यासाठी, ग्राहकाने अन्य आवश्यक माहिती भरणे आवश्यक आहे.
8. शेवटी, आपल्याला NPS मध्ये योगदान द्यावे लागेल. पैसे भरल्यानंतर डिजिटल रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण होईल.
जर दररोज 53 रुपये वाचवून रिटायरमेंट नंतर तुम्हाला मिळतील 1 कोटी रुपये
जर आपण दररोज 53 रुपये वाचवले तर याचा अर्थ असा की आपण एका महिन्यात सुमारे 1590 रुपये जमा कराल. समजा तुमचे वय 20 वर्षे आहे आणि अशी अपेक्षा आहे की, तुम्हाला NPS कडून साधारणतः 10 टक्के वार्षिक उत्पन्न मिळेल. अशा परिस्थितीत तुम्हाला दरमहा 40 वर्षे 1590 रुपये जमा करावे लागतील आणि वयाच्या 60 व्या वर्षी तुम्ही रिटायर व्हाल तेव्हा तुमच्याकडे 1.01 कोटी रूपये जमा होतील.
कोण गुंतवणूक करू शकेल हे जाणून घ्या?
18 वर्ष ते 65 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती NPS मध्ये गुंतवणूक करू शकेल. जेव्हा आपण 60 वर्षांचे व्हाल तेव्हा त्याची मॅच्युरिटी येते. म्हणजेच आपण वयाच्या 18 व्या वर्षापासून किंवा 50 व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली असलात तरी वयाच्या 60 व्या नंतरच तुम्हाला पैसे मिळतील. तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक करण्यास सुरवात कराल तितका जास्त फायदा तुम्हाला मिळेल.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा