हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Google Pay : Google आपल्या युझर्ससाठी नेहमीच काही ना काही इनोव्हेटिव्ह घेऊन येत असते. आताही गुगलने आपल्या GPay मध्ये एक नवीन फिचर जोडण्यात आले आहे. जे लाखो लोकांसाठी सोयीस्कर ठरणार आहे. Google ने आपल्या GPay App मध्ये Hinglish नावाने एक नवीन भाषा जोडली आहे. ही रोमन लिपी आणि हिंदी भाषा या दोहोंचे मिश्रण असेल.
गेल्या वर्षीच गुगलने हिंदी आणि इंग्रजी भाषेचे हे मिश्रण करून एक नवीन भाषा जोडणार असल्याची घोषणा केली होती. आता हे सर्व युझर्ससाठी रिलीज केले गेले आहे. या नवीन फीचरद्वारे आपल्याला Google Pay वर इंग्रजीतून हिंदी वाचता येणार आहे.
कोणत्या युझर्सचा फायदा होईल?
या नवीन भाषेच्या सपोर्टमुळे ज्यांना हिंदी चांगले वाचता येत नाही आणि त्यांचे इंग्रजी देखील चांगले नाही अशा युझर्सचा फायदा होईल. कमकुवत इंग्रजी आणि हिंदी (देवनागरी लिपीमध्ये लिहिलेल्या) मुळे या App चे फीचर्स समजण्याच्या समस्येपासून आता युझर्सची सुटका होणार आहे.
इथे हे लक्षात घ्या कि Hinglish भाषा हे हिंदी आणि इंग्रजी भाषेचे मिश्रण आहे. जसे आपण आपल्या मित्रांशी बोलताना वापरतो अगदी तसेच… Google चे पेमेंट App हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) वर आधारित आहे. यासोबतच या App मध्ये आता आणखी 9 भाषांना देखील सपोर्ट मिळेल. हायब्रिड भाषेला सपोर्ट करणारे गुगलचे हे पहिलेच App आहे.
तसेच हे Android आणि iOS वर Google Pay चे लेटेस्ट व्हर्जन अपडेट केलेल्या युझर्सना आपली भाषा म्हणून Hinglish सेट करता येईल. यामध्ये हिंदी, इंग्रजी, इंग्रजी (यूएस), Hinglish व्यतिरिक्त भारतातील बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, तमिळ, तेलगू या आणखी 6 स्थानिक भाषांचा देखील समावेश करण्यात आला आहे. GPay
ही भाषा कशी सेट करावी जाणून घ्या …
सर्वांत आधी Google Pay App उघडा.
वर असलेल्या आपल्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
त्यानंतर सेटिंगमध्ये जा. सेटिंग्ज मेनूमधील Personal Info वर टॅप करा.
त्यानंतर Language वर जा.
येथून आपल्या आवडीची भाषा निवडता येईल.
Hinglish ही भाषा सेट करायची असल्यास त्यावर टॅप करा.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://pay.google.com/
हे पण वाचा :
OTT प्लॅटफॉर्म आणि चित्रपटगृहांबाबत Abhishek Bachchan चे मोठे विधान, अनेक गोष्टींचा केला खुलासा
नवीन M2 चिप सहित येणार MacBook Pro आणि MacBook Air, फीचर्स जाणून घ्या
पहिल्या वर्धापनदिनालाच पुन्हा ‘अडकले’ Income Tax पोर्टल, विभागाने इन्फोसिसला फटकारले
Drugs : भारत-पाक सीमेवर 15 कोटी किंमतीचे साडेतीन किलो हेरॉईन जप्त
‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना 1 वर्षात दिले दुप्पट पैसे !!!