नवी दिल्ली । देशातील ऑटोमोबाईल क्षेत्र वेगाने इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात बदलत आहे. ऑटो मार्केटमध्ये दररोज नवीन इलेक्ट्रिक वाहने दाखल होत आहेत. जरी मोठ्या संख्येने लोकं इलेक्ट्रिक बाइक किंवा कार देखील खरेदी करत आहेत, मात्र या वाहनांच्या चार्जिंगबद्दल लोकांच्या मनात नेहमीच शंका असते. इलेक्ट्रिक वाहनांमुळे लांब पल्ल्याच्या प्रवासाचा धोका पत्करता येत नाही. बॅटरी चार्जिंगची योग्य व्यवस्था नसल्यामुळे अनेकजण इलेक्ट्रिक वाहने घेण्यास टाळाटाळ करतात.
मात्र, सरकार आणि वाहन निर्माते इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगवर सतत काम करत आहेत. सर्व पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारले जात आहेत. एक चांगली बातमी म्हणजे सरकार लवकरच देशात बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी लागू करणार आहे. NITI आयोग म्हणतो की,” ते पुढील तीन महिन्यांत बॅटरी स्वॅपिंग धोरण लागू करण्याच्या धोरणावर काम करत आहे.”
यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी लागू करण्याबाबत सांगितले होते. या पॉलिसीमध्ये, वाहनाची डिस्चार्ज केलेली बॅटरी चार्ज केलेल्या बॅटरीने बदलली जाईल. बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी अंतर्गत, तुमची इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी तुम्हाला चार्जिंग स्टेशनवर तासन् तास उभे राहावे लागणार नाही. उलट, तुम्ही रिकामी बॅटरी देऊन चार्ज केलेली बॅटरी घेऊ शकाल. त्यानंतर नाममात्र शुल्क भरावे लागेल.
बॅटरी स्वॅपिंग सेंटर उघडेल
बॅटरी स्वॅपिंग योजनेमुळे रोजगारालाही चालना मिळेल. वेगवेगळ्या ठिकाणी बॅटरी स्वॅपिंग सेंटर उघडण्यात येणार असून, त्यातून मोठ्या प्रमाणात तरुणांना काम मिळेल. यासोबतच इलेक्ट्रिक वाहनांची खरेदीही वाढणार आहे.
बॅटरी स्वॅपिंग पॉलिसीमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीही कमी होतील, असे सांगण्यात येत आहे. कारण, इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या किंमतीपैकी निम्मा खर्च बॅटरीचा असतो. स्वॅपिंग व्यवसायाच्या विकासामुळे तुम्ही बॅटरीशिवाय वाहन खरेदी करू शकाल आणि बाजारातून बॅटरी विकत घेऊन वाहनात बसवू शकाल.
दुचाकीपासून सुरुवात होईल
बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी लागू केल्यामुळे, सर्व वाहनांमध्ये एकाच आकाराच्या आणि क्षमतेच्या बॅटरी बसवल्या जातील. देशात बॅटरी स्वॅपिंगची सुरुवात दुचाकी वाहनांपासून होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.