Thursday, October 6, 2022

Buy now

क्षेत्र महाबळेश्वरमध्ये नृहसिंह जयंती उत्साहात साजरी

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे नृरसिंह जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसिलदार सुषमा पाटील यांच्या हस्ते महाआरतीने करण्यात आली.

श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ मंडळ क्षेत्र महाबळेश्वर,व्यापारी संघटना यांच्या यांच्यावतीने नृरसिंह जयंती जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सभामंडप भाविक, ग्रामस्थ व पर्यटकांनी गजबजून गेले होते. मोठ्या उत्साहात सुरू झालेल्या जयंतीच्या धार्मिक कार्यक्रमाची सांगता तहसिलदार सुषमा पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

यावेळी भाविकभक्त, क्षेत्र महाबळेश्वर येथील ग्रामस्थ तसेच पर्यटक देखील उपस्थित होते. या ठिकाणी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात नृरसिंह जयंती साजरी करण्यात आली. कोरोनामुळे आतापर्यंत साध्या पद्धतीनेच जयंती साजरी केली जात होती. मात्र, कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने यंदा भाविकांच्या वतीने मोठ्या संख्येने जयंती कार्यक्रमास उपस्थिती लावण्यात आली होती.