व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा…!: मुख्यमंत्री ठाकरेंनंतर आज फडणवीसांची सभा; काय बोलणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात शिवसेनेने सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री ठाकरे यांची सभा शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर पार पडली. या सभेतून त्यांनी भाजपसह विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. यानंतर फडणवीसांकडूनही ट्विट करीत मुख्यमंत्री ठाकरेंना “जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा…, असा इशारा दिला आहे. तसेच फडणवीसांची आज गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये सभा होणार असून त्यामध्ये ते मुख्यमंत्र्यांना नेमके काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

उद्धव ठाकरे यांनी काल जाहीर सभा घेत भाजप व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांनी बाबरी मशिदीवरून फडणवीसांना टोलेही लगावले. बाबरी पडताना फडणवीस सहलीला गेले होते. हे चढले असते तर बाबरी वजनाने पडली असती. अशा शब्दात मुख्यमंत्री ठाकरेंनी फडणविसावर टीका केली. त्याच्या टीकेनंतर फडणवीसांनीही काल लगेच ट्विट करीत त्यांना उत्तर दिले जबाब मिलेगा और ठोक के मिलेगा, असे फडणवीसांनी म्हंटले होते. त्यानंतर आज मुंबईत फडणवीसांची जायीर सभा सायंकाळी होणार आहे. या सभेतून त्याची तोफ धडाडणार आहे.

मुंबईत सायंकाळी सहा वाजता देवेंद्र फडणवीस हे सभा स्थळी दाखल होणार आहेत. त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याकडून मुख्यमंतरू उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले जाणार आहे. आता ते सभेतून कोणाकोणावर निशाणा साधणार? महा विकास आघाडीबाबत तसेच राज ठाकरे यांच्याबाबत नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.