भोपाळ : वृत्तसंस्था – नर्सिंगचा कोर्स करणाऱ्या एका विद्यार्थिनीला खाण्यातून गुंगीच औषध देवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. हे कृत्य पीडित तरुणीच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या एका तरुणानं केले आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने पीडितेचे अश्लील व्हिडीओसुद्धा शूट केले आहेत. यानंतर आरोपी अश्लील व्हिडीओच्या आधारे पीडितेला ब्लॅकमेल करत होता. यानंतर आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने पोलिसांत धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.
हि घटना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील आहे. आरोपीचे नाव गोविंद अहिरवार असे आहे. आरोपी अहिरवार आणि 26 वर्षीय पीडित तरुणी एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतात. आरोपी अहिरवार यानं 14 ऑगस्ट रोजी पीडितेला कॉलेजला सोडण्याचा बहाणा केला. कॉलेजचाच ओळखीचा मित्र असल्यानं पीडित तरुणीही त्याच्या गाडीत बसली. दरम्यान, आरोपीनं आपली कार थांबवून वाटेत असणाऱ्या एका भोजनालयातून खाण्यासाठी काही पदार्थ खरेदी केले. हे पदार्थ खाल्ल्यानंतर पीडित तरुणी बेशुद्ध झाली. यानंतर आरोपी पीडित तरुणीला आपल्या भाड्यानं राहत असलेल्या घरी घेऊन गेला आणि तिकडे तिच्यावर बलात्कार केला.
हा आरोपी नराधम एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने या घटनेचा अश्लील व्हिडीओदेखील शूट केला. यानंतर आरोपीनं संबंधित व्हिडीओच्या आधारे पीडित तरुणीला ब्लॅकमेल करू लागला. आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित तरुणी आपल्या आई वडिलांकडे अलीराजपूर येथे गेली आणि तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार तिने आपल्या पालकांना सांगितला. आरोपीनं पीडितेला जीवे मारण्याची आणि संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या पालकांनी अलीराजपूर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या घरी जाऊन छापा टाकला असता, संबंधित आरोपी तिकडून फरार झाला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.