सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
सातारा जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी आज (गुरुवार) आरक्षण साेडत काढण्यात आली. ही साेडत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियाेजन भवन येथे काढण्यात आली. जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या उपस्थिती आरक्षण सोडत पार पडली. सातारा जिल्हा परिषदेच्या एकूण 73 जागांपैकी 37 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. फलटण तालुक्याला लाॅटरी लागली असून सर्वच जिल्हा परिषदेच्या जागा या सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या आहेत.
जिल्हा परिषद आरक्षण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे ः 1) कराड तालुका – अनुसुचित जाती – कोपर्डे हवेली (महिला), येळगाव (महिला), तांबवे. नागरिकांचा मागास प्रवर्ग- उंब्रज, चरेगांव (महिला), विंग (महिला), सैदापूर, वडगाव हवेली (महिला), रेठरे बु, सर्वसाधारण प्रवर्ग- पाल (महिला), मसूर, वारूंजी (महिला), कार्वे (महिला), काले (महिला). 2) सातारा तालुका- अनुसुचित जाती- कोडोली, नागरिकांचा मागास प्रवर्ग- खेड (महिला), कोंडवे, कारी (महिला), पाडळी, सर्वसाधारण प्रवर्ग- लिंब (महिला), पाटखळ (महिला), देगांव (महिला), नागठाणे (महिला), अपशिंगे. 3) फलटण तालुका सर्व सर्वसाधारण प्रवर्ग आरक्षण – कोळकी (महिला), वाठार निं (महिला), तरडगाव, साखरवाडी (पिंपळवाडी), सांगवी, विडणी, गुणवरे, बरड, हिंगणगाव.
4) खंडाळा तालुका- नागरिकांचा मागास प्रवर्ग- भादे (महिला), खेड बु., सर्वसाधारण प्रवर्ग – शिरवळ (महिला). 5) कोरेगाव तालुका- अनुसुचित जाती- सातारारोड, नागरिकांचा मागास प्रवर्ग- पिंपोडे बु सर्वसाधारण प्रवर्ग- वाठार स्टेशन (महिला), कुमठे, एकंबे, वाठार किरोली (महिला). 6) वाई तालुका- अनुसुचित जाती- केंजळ, बावधन, नागरिकांचा मागास प्रवर्ग- अोझर्डे, सर्वसाधारण प्रवर्ग- पसरणी, भुईंज. 7) महाबळेश्वर तालुका- सर्वसाधारण प्रवर्ग- तळदेव (महिला), भिलार (महिला). 8) जावली तालुका- नागरिकांचा मागास प्रवर्ग- कुडाळ, कुसुंबी (महिला), सर्वसाधारण प्रवर्ग- म्हसवे (महिला),
9) पाटण तालुका- अनुसुचित जाती- मल्हारपेठ (महिला), नाटोशी (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग- गोकुळ तर्फ हेळवाक (महिला), मुद्रुळकोळे (महिला). सर्वसाधारण प्रवर्ग- तारळे, म्हावशी (महिला), मारूल हवेली, धामणी (महिला). 10) माण तालुका- सर्व जागा सर्वसाधारण प्रवर्गसाठी – आंधळी (महिला), बिदाल (महिला), मार्डी, गोंदवले बु, कुकुडवाड. 11)खटाव तालुका- नागरिकांचा मागास प्रवर्ग- सिध्देश्वर कुरोली (महिला), सर्वसाधारण प्रवर्ग- आैंध (महिला), बुध, पुसेगाव, खटाव, निमसोड, पुसेसावळी, मायणी.