महाविद्यालयीन युवतीला मेसेज, एकतास लाॅजवर चल अन् दुचाकीवरून निघाले

Nirbhya
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा येथे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या युवतीला मोबाईलवर अश्लील मेसेज करून तिला ब्लॅकमेल करत जबरदस्तीने लॉजवर घेऊन जाणाऱ्या युवकाला निर्भया पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. अक्षय रमेश मदने (वय- 25, रा. राजापूर ता खटाव जि. सातारा) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित युवकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अक्षय मदने या युवकाने संबंधित युवतीला 30 जून रोजी तिच्या मोबाईलवर मेसेज करत तिला ‘तुझे माझ्याकडे व्हिडिओ आहेत, ते डिलीट करायचे असतील. तर तू माझ्याबरोबर एक तास लॉजवर यायचं आणि नाही, आलीस तर तुझे व्हिडिओ व्हायरल करीन, असे मेसेज करत धमकावण्यास सुरुवात केली. या प्रकरणातील घाबरलेल्या युवतीने निर्भया पथकास घडलेली हकीकत सांगितली व आपला तक्रार अर्ज दिला. सहाय्यक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या सूचनेवरून यावरून घटनेचे गांभीर्य ओळखून त्या अनोळखी युवकास ताब्यात घेण्यासाठी शक्कल लढवत सापळा रचला. संबंधित युवतीला तिच्या मोबाईलवरून त्या युवकास मेसेज करत भेटण्यास सांगितले.

संबधित युवकाने युवतीला थेट लॉजवरच जाण्याचा आग्रह धरला. तिला दुचाकीवर बसवून जिल्हा न्यायालयाच्या आवारात आला. यावेळी निर्भया पथकाच्या राठवडे आणि माने यांनी संबंधित युवकास ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता. त्याने त्याचे नाव अक्षय रमेश मदने (वय 25, रा. राजापूर ता खटाव जि. सातारा) असे सांगतले. त्यानंतर संबंधित युवकास सातारा शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून सदर युवतीने त्याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. निर्भया पथकाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे संशयित युवक अलगद जाळ्यात सापडला.