जवळपास ठरलं! आता ‘या’ कालावधीत होणार IPL स्पर्धा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनिश्चित काळाकरीता स्थगित करण्यात आलेली आयपीएल स्पर्धा नेमकी कधी हा प्रश्न प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या मनात आहे. मात्र, चाहत्यांच्या या प्रश्न उत्तर जवळपास मिळालं आहे. कारण आयपीएल येत्या काही महिन्यांमध्ये सुरु होऊ शकते. भारतामध्ये चौथ्या लॉकडाऊनमध्ये क्रीडा क्षेत्राला दिलासा मिळेल, असे म्हटले गेले होते. त्यानंतर आता बीसीसीआयटने कंबर कसली आहे आणि आयपीएल भरवण्यासाठी त्यांनी काही ठोस पावले उचलली आहे. आयपीएलच्या तारखाही जाहीर केल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर बीसीसीआयच्या अपेक्स कौन्सिलच्या सदस्यांनेही आयपीएल कोणत्या कालावधीत होऊ शकते, याबाबत भाष्य केले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिलं आहे.

भारताचे माजी क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि विद्यमान अपेक्स कौन्सिलचे सदस्य अंशुमन गायकवाड यांनी याबाबत आज काही महत्वाचे वक्तव्य केलं असल्याचे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटलं आहे. आयपीएलसाठी कोणता कालावधी हा चांगला असेल, याबाबत त्यांनी भाष्य केले आहे. अंशुमन गायकवाड म्हणाले की, ” यावर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. पण या स्पर्धेबाबत अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे. ही स्पर्धा जर झाली नाही तर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयपीएल खेळवले जाऊ शकते. पण त्यासाठी भारतामधील वातावरण नेमके कसे आहे, हे पहिल्यांदा पाहावे लागेल. भारतामध्ये क्रिकेट कधी सुरु होईल, हे कोणी सांगू शकत नाही. कदाचित या गोष्टीला दोन किंवा चार महिनेही लागू शकतात. भारतातील परिस्थितीवर ते अवलंबून असेल. पण जर स्पर्धा खेळवायची झाली तर त्यासाठी मानसीकरीत्या सक्षम असणे गरजेचे आहे.” असं अंशुमन गायकवाड यांनी सांगितलं दरम्यान, देशातील कोरोनाची परिस्थितीच आयपीएलचे भवितव्य ठरणार आहे.

दरम्यान, यंदाची आयपीएल ही २९ मार्च पासून सुरु होणार होती. पण लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर १५ एप्रिलला बीसीसीआयने आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली होती. पण आयपीएलचे आयोजन करण्याबाबत आता विचार सुरु झाला आहे. त्यानुसार ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयपीएल खेळवले जाऊ शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment