नवी दिल्ली । भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिकने आपल्या कंपनीचे मूल्यांकन 37 हजार कोटींवर गेले आहे. कंपनीने याद्वारे 1,490.5 कोटी उभारल्याचे जाहीर केले आहे. ओला इलेक्ट्रिकने सांगितले की.”त्यांनी हा फंड टेकने प्रायव्हेट व्हेंचर्स, अल्पाइन अपॉर्च्युनिटी फंड, एडलवाइज यासारख्या कंपन्यांकडून उभारला आहे.”
ओला इलेक्ट्रिकचे सीईओ आणि सह-संस्थापक भाविश अग्रवाल म्हणाले की,”ओला इलेक्ट्रिक भारतात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहे. कंपनी संपूर्ण जगासाठी भारतातून अत्याधुनिक उत्पादन चालवत आहे.”
अग्रवाल यांनी सांगितले की,”Ola S1 च्या माध्यमातून इलेक्ट्रिक स्कूटर इंडस्ट्रीमध्ये मोठा बदल झाला आहे. आम्ही आता आमची नाविन्यपूर्ण उत्पादने बाइक आणि कारसह जास्त दुचाकी श्रेणींमध्ये आणण्यासाठी उत्सुक आहोत.” ते पुढे म्हणाले की,”गुंतवणूकदारांच्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि EV क्रांती भारतातून जगभर नेण्यासाठी त्यांच्यासोबत भागीदारी करण्यास उत्सुक आहे.”
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये Ola ने Falcon Edge, SoftBank आणि इतरांकडून $20 कोटी जमा केले होते. त्यावेळी ओला इलेक्ट्रिकचे मूल्यांकन सुमारे $3 अब्ज होते. ओला इलेक्ट्रिकने यापूर्वी टायगर ग्लोबल आणि मॅट्रिक्स इंडिया सारख्या इतर गुंतवणूकदारांकडून फंड उभारला होता. ओला इलेक्ट्रिकने गेल्या वर्षी जुलैमध्ये बँक ऑफ बडोदासोबत 10 वर्षांच्या कालावधीसाठी कर्ज वित्तपुरवठा कराराची घोषणा केली होती.
हा फंड अशा वेळी आला आहे जेव्हा ओला इलेक्ट्रिक आपल्या S1 आणि S1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटर्सचे उत्पादन वाढवण्याचे टार्गेट ठेवले आहे. Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1 लाख रुपये आहे, तर जास्त शक्तिशाली S1 Pro ची किंमत 1.30 लाख रुपये आहे. या फंडींगमुळे ओलाच्या ‘फ्यूचरफॅक्टरी’ची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे, ज्याचे उद्दिष्ट जगातील सर्वात मोठे दुचाकी उत्पादन प्रकल्प बनण्याचे आहे. या प्लांटमध्ये 10,000 पेक्षा जास्त महिला कार्यरत आहेत आणि जागतिक स्तरावर महिलांच्या सर्वात मोठ्या कारखान्यांपैकी एक आहे.