कराडात पटोलेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाचे आंदोलन

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केले. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचुअवतीने आक्रमक पवित्रा घेण्यात आलेला आहे. दरम्यान, पटोलेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाच्या वतीने कराड येथील दत्त चौकात जोडोमारो आंदोलन करण्यात आले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर काल पुन्हा त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “ज्याची बायको पळून जाते, त्याचे नाव मोदी ठरते,” असे आक्षेपार्ह वक्तव्य पटोले यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. सातारा जिल्ह्यातील भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. दरम्यान आज कराडातही याचे पडसाद उमटले.

दरम्यान कराड येथील भाजप कार्यकर्त्यांच्यावतीने जोडो मारो आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी कार्यकत्यांच्यावतिने नाना पटोले यांना गाढवाची उपमा देत घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पाटस्कर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.