माजी हॉकीपटू रवींदर पाल सिंह यांचे कोरोनाने निधन

Ravinder Pal Singh
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मॉस्को ऑलिम्पिक १९८०च्या सुवर्णपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचे माजी सदस्य रवींदर पाल सिंग यांचे वयाच्या ६५व्या वर्षी कोरोनाने निधन झाले आहे. रवींदर पाल यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना २४ एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

रवींदर पाल यांनी मॉस्को आणि लॉस एंजेलिस ऑलिम्पिक,चॅम्पियन्स ट्रॉफी, रौप्य महोत्सवी १०-नेशन कप, वर्ल्डकप अशा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच १९७९मध्ये ज्युनियर विश्वचषक संघात त्यांचा समावेश करण्यात आला होता.

रवींदर पाल यांची भाची प्रज्ञा यादव यांनी बुधवारी रवींदर पाल सिंग यांच्या उपचारासाठी हॉकी इंडियाकडे आर्थिक मदतीची विनंती केली होती. तेव्हा फेडरेशनच्या अध्यक्षांनी त्यांच्यावरील उपचार आणि रुग्णालयातील खर्चासाठी पाच लाख रुपये मंजूर केले होते.