ऑलम्पिक पट्टू प्रविण जाधव आणि शेजाऱ्यांचा जागेचा वाद मिटला : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | ऑलम्पिक पट्टू प्रवीण जाधव यांच्या कुटुंबियांना घर बांधण्यासाठी जो काही त्रास दिला जात आहे. त्याबाबत सातारा पोलिस विभाग आणि महसूल विभागामार्फत मध्यस्थी करण्यात आली आहे. आता या दोन्ही कुटुंबातील वाद मिटला असल्याचे राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.

टोकियो ऑलम्पिकमध्ये ‘आर्चरी’ (तिरंदाजी) क्रिडा प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करणा-या प्रविण जाधवला घराचे  बांधकाम करण्यावरुन शेजा-यांच्या कलहाला तोंड द्यावे लागत आहे. चार गुंठे जागेवरुन सुरु झालेला वाद प्रशासनापर्यंत पोहचला आहे. “प्रांताधिका-यांनी घर बांधायला जागा दिली असताना त्यात समाधानाने रहाता येत नसेल तर या गावात राहून तरी काय करायचे. त्यामुळे केवळ गावच नव्हे तर जिल्हा सोडून जाण्याचा पवित्रा कुटुंबाने घेतला होता.

फलटणपासून साधारण १६ किलो मिटर अंतरावर असलेले सरडे हे प्रविणचे गाव आहे. सरडे गावात प्रविणचे वडील आजही मजुरी करतात. जागतिक ऑलम्पिक स्पर्धेमधील ‘आर्चरी’ (तिरंदाजी) या क्रीडा प्रकारासाठी भारतीय संघात सरडे गावचा प्रविण जाधव याची निवड झाली होती. घरी आई-वडील, चुलती व चुलतभाऊ असे चार जणांचे कुटुंब दोन खोल्यांमध्ये रहाते. स्वत:चे घर नसल्याने शेती महामंडळाने त्यांना 84 गुंठे शिल्लक जागेपैकी काही गुंठे क्षेत्र घर बांधण्यासाठी दिले आहे. त्याठिकाणी बांधकाम करायला शेजारी राहणा-या एका कुटुंबाचा विरोध आहे. या विरोधातून दोन दिवसापूर्वी दोन्ही कुटु्ंबात वाद झाला होता. मात्र सातारा पोलिस विभाग आणि महसूल विभागामार्फत मध्यस्थी करण्यात आली त्यांनी वाद मिटविल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

काय होते प्रकरण ?

“फलटणच्या प्रांताधिका-यांनी आम्हांला घर बांधणीसाठी जागा मोजून दिली आहे. शेती महामंडळाच्या 84 गुंठे शिल्लक क्षेत्रातील जागा आम्हांला मोजून देण्यात आली आहे. तरी शेजारचे एक कुटुंब शेती महामंडळाने दिलेली जागा आमचीच आहे, असं सांगून बांधकामात अडथळा आणत होते.” प्रवीण जाधव च्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबाने दोन खोल्याचे घर जेसीबीने पाडू अशी धमकी त्यांना दिली होती. प्रवीण जाधवसारख्या ऑलिम्पिक खेळलेल्या खेळाडूंच्या कुटुंबावर अन्याय होत असेल आणि त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करणार असेल तर ही निंदनीय बाब होती.

Leave a Comment