मुंबई। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक बाधित महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रविवारी महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे आणखी 7 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. नवीन रुग्ण आढळल्यानंतर राज्यात ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 8 झाली आहे. नवीन प्रकरणांनंतर, ओमिक्रॉन व्हेरिएंटनी संक्रमित रुग्णांची संख्या देशभरात 12 झाली आहे. 7 नवीन रुग्ण आढळल्यानंतर, महाराष्ट्राच्या आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की,”पुण्यात परदेशातून परतलेल्या 4 लोकांना भारतात ओमिक्रॉन केसची लागण झाल्याचे आढळले आहे.”
त्यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवडमध्ये 6 बाधित आढळले आहेत, त्यापैकी 3 नायजेरियातून परतले आहेत. त्याचवेळी फिनलँडहून पुण्यात परतलेल्या एका नागरिकाला ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचे आढळून आले आहे.
अनेक देशांमध्ये कोरोनाचे नवीन ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंट वेगाने पाय पसरताना दिसत आहे. हे व्हेरिएंट रोखण्यासाठी, अनेक राज्यांच्या सरकाररांनी आधीच कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे, असे असूनही, भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या एकूण प्रकरणांची संख्या 12 झाली आहे.