प्रियांका गांधींचा साधेपणा!! पुण्यात VIP ताफा सोडून वॅग्नोरमधून केला प्रवास

Priyanka Gandhi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. या निवडणुकीमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने ही आपली कंबर कसली आहे. अशातच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या पुण्यामधून निवडणुक लढविणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. दरम्यान आज प्रियंका गांधी या पुणे दौऱ्यावर देखील आल्या आहेत. त्यामुळे या चर्चांना जोर आणखीन वाढला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांना घेऊन राज्यात वेगवेगळ्या घडामोडी घडत असताना आज प्रियंका गांधी पुणे दौऱ्यावर आल्या आहेत. मात्र प्रियंका गांधी यांचा आजचा दौरा कसा असेल याबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आज पुणे विमानतळावर आगमन झाल्यावर प्रियांका गांधी यांनी व्हीआयपी ताफा सोडून वॅग्नोर या चारचाकी वाहनांतून जाण्यास पसंती दाखवली. त्यांच्या याच कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सध्या प्रियांका गांधी या एका खाजगी कार्यक्रमासाठी पुण्यात आल्या असल्याचे म्हटले जात आहे. मात्र याबाबत कोणतीही ठोस माहिती समजू शकलेली नाही.

https://www.instagram.com/reel/Cy2kGH0NX0N/?igshid=MzRlODBiNWFlZA==

प्रियंका गांधी पुण्यातून लढणार

पुणे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र सध्या याच राष्ट्रवादीमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये पुण्यावर कोणता गट वर्चस्व गाजवेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी देखील पुण्यातून निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले जात आहे. ज्यामुळे आज त्या पुणे दौऱ्यावर आल्या असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजुला प्रियंका गांधी फक्त एका खाजगी कामासाठी पुण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.