Tuesday, October 4, 2022

Buy now

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर उदरनिर्वाहाचे साधन देत HRC संस्थेने विविध क्षेत्रातील महिलांचा केला सन्मान

हॅलो महाराष्ट्र | परभणी प्रतिनिधी

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर रविवार 6 मार्च रोजी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थे तर्फे 8 निराधार, दुर्धर आजारग्रस्त व विधवा महिलांना उदरनिर्वाहासाठी साधन वाटप करून विविध क्षेत्रातील 8 महिलांचा सन्मान करण्यात आला. परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात झालेल्या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते प्रा .जयंत देशपांडे, दामिनी पथकातील उपनिरीक्षक राधिका भावसार, प्राचार्य डॉ . बाबर, ह.भ.प. शिवव्याख्याते स्वामिराज भिसे, प्रा शिवा आयथळ, प्रा प्रशांत वक्ते, प्रा आनंद मनवर यांची उपस्थिती होती .

होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेच्या वतीने महापुरुषांच्या जयंती, भारतीय सण तसेच विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने समाजातील उपेक्षित महिलांना उदरनिर्वाहाचे साधन दिली जाते. आज जागतिक महिला दिनानिमित्त आठ निराधार दुर्धर आधारग्रस्त महिलांच्या मागणीनुसार त्यांना 1 महिलेला डाळ काढण्याची मशीन, 5 महिलेला शिलाई मशीन, 2 महिलेला उदरनिर्वाहासाठी शेळी व शेळीचे पिल्लू आदींची मदत लोकसहभागातून करण्यात आली.

सलाम तिच्या जिद्दीला: विविध 8 क्षेत्रात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान ‘सलाम तिच्या जिद्दीला’ अंतर्गतवैष्णवी विष्णुपंत देशपांडे (कृषी),डॉ. आरती देऊळकर (वैद्यकीय), अश्विनी जाधव (क्रीडा), अर्चना पंडितराव दुधाटे (सामाजिक), प्रा पुजा राधाकिशन काकडे (शिक्षण), सुमन प्रकाश पाळोदे (स्वच्छता), संगीता वाघमारे (पोलीस), अमिता रौफ बकश (तृतीय पंथ सामाजिक) यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात ‘हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सारथी’ या विषयावर पुणे येथील शिवव्याख्याते ह भ प प्रा स्वामीराज भिसे यांचे व्याख्यान झाले. डॉ. पवन चांडक, डॉ. सौ आशा चांडक, राजेश्वर वासलवार, भाग्यश्री सावळे, ममता जाधव, पूजा काकडे, भक्ती तायडे, अंजली जोशी, विशाखा हेलसकर, शलाका हेलसकर, पद्मा भालेराव, बुद्धभूषण गाढे, ज्ञानेश्वर इक्कर, श्रीरंग पांडे, पांडुरंग पाटणकर, सत्यनारायण चांडक यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Related Articles

Latest Articles