महापुरुषांच्या जयंतीला दोन अवलीया वाटतात गरिबांना फळे

औरंगाबाद – आपल्या देशात महापुरुषांच्या जयंती विविध उपक्रमांनी साजऱ्या केल्या जातात. त्यामध्ये फळ वाटप, गरजूंना जेवन देणे, यासह इतर अनेक उपक्रमांनी महापुरुषांच्या जयंत्या साजरी होतात. आजदेखील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आहे.

 

यानिमित्ताने औरंगाबाद शहरातील दोन समाजसेवकांनी शहरातील गोरगरिबांना फळे वाटप केले आहे. अभिजीत जीरे व रवींद्र जाधव अशी त्या दोघांची नावे आहेत. हे दोघे सर्व महापुरुषांच्या जयंतीला गोर गरीबांना फळे वाटप करत असतात.

 

महापुरुषांच्या जयंतीला गोर गरीबांना फळे वाटप करण्याचा उपक्रम त्यांनी गेली 10 वर्षांपासून सुरू केला आहे. अशा प्रकारे विविध उपक्रम राबवून महापुरुषांची जयंती साजरी करण्याचे हे त्यांचे 11वे वर्ष आहे.