Cancer Survivors Day’निमित्त सोनाली बेंद्रेने सांगितला आपला संघर्षमय प्रवास; शेअर केली भावनिक पोस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेने कॅन्सर सारख्या रोगाशी दोन हात करीत त्यावर मत केल्याचे आपण सारेच जाणतो. पण हा काळ तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबियांसाठी काही सोपा नव्हता. २ वर्षांपूर्वी तिला कॅन्सरसारख्या मोठ्या रोगाने ग्रासले होते. यावेळी सोनाली बऱ्याच भावनिक आणि कठीण काळातून गेली आहे. दरम्यान न्यूयॉर्कमध्ये तिच्यावर उपचार सुरु होते. कित्येक महिन्यांच्या उपचारानंतर आणि आत्मविश्वासाच्या बळावर ती बरी झाली होती. आज Cancer Survivors Day असल्यामुळे सोनालीने या दिवसाचे निमित्त साधून सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत, या कठीण काळाचा संघर्ष सांगितला आहे.

https://www.instagram.com/p/CPx3739HqvH/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेत्री सोनाली बेंद्रेने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटर आपला आजारपणाचा आणि आत्ताचा असा एक फोटो शेयर केला आहे. त्यासोबत तिने एक खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे कि, ‘वेळ कसा उडून जातो. जेव्हा मी मागे वळून बघते, मला माझी ताकत दिसते, मला माझा कमकुवतपणा दिसतो. मात्र महत्वाचं म्हणजे, मला माझी इच्छाशक्ती दिसते. कॅन्सर वॉर्ड ठरवू शकत नाही की माझी लाईफ यानंतर कशी असेल, तुम्हाला जी लाईफ हवी आहे ती तुम्हाला स्वतः क्रिएट करावी लागेल. आयुष्याचा हा प्रवास तुम्ही कसा कराल हे तुमच्यावर असतं, यामध्ये प्रखर इच्छाशक्ती असणे खूप महत्वाचे आहे’. अशा आशयाची पोस्ट लिहित सोनालीने आपापल्या संघर्षमय काळात साहलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

https://www.instagram.com/p/CLZVwO2np3D/?utm_source=ig_web_copy_link

या आजारावरील उपचारादरम्यान सोनाली कित्येक महिने आपल्या कुटुंबापासून दूर न्यूयॉर्कमध्ये होती. या काळात तिला प्रचंड वेदना आणि दुःखाचा सामना करावा लागला होता. यावेळी तिचे चाहते आणि सहकलाकार तिच्या सुदृढ आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. या काळात सोनालीचा पती गोल्डी बेहेलसुद्धा तिच्या पाठीशी खंबीर उभा होता. मायदेशी परतल्यानंतर सोनालीने अनेक मुलाखतींमध्ये म्हटले होते, की कॅन्सरपेक्षा भयानक उपचार होते. उपचार करताना ती प्रचंड वेदनेतून गेली मात्र सोनालीने या दुर्दम्य आजारावर यशस्वी मात केलीच. आज ती पूर्वीसारखं आपलं आयुष्य जगत आहे. सोनाली प्रत्येक कॅन्सर पीडित लोकांसाठीही एक आदर्श आहे. ज्या धाडसाने तिने या आजारावर मात केली आहे ते खरोखरीच कौतुकास्पद आहे. अश्या या दृढ निश्चयी आणि आत्मविश्वासू जिद्दीला सलाम..!

Leave a Comment